अनेक देशांकडून निषेध

Israeli missiles hit site in Iran
Iran-Israel War : इस्रायलची इराणविरोधात कारवाई सुरू, न्यूक्लीअर साईट्स असलेल्या शहरात अनेक स्फोट
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
INDIA bloc collapse in Kashmir complete NC PDP fielded candidates against each other
काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे ‘तीनतेरा’; NC, PDP ने एकमेकांविरोधात दिले उमेदवार
United Nations
इस्रायल-हमास युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्रासंघाचा ठराव, भारत मात्र गैरहजर; नेमकं कारण काय?

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबाबत जगभरातील नेत्यांनी संताप व्यक्त केला असला, तरी युरोपमध्ये संभाव्य मोठे युद्ध टाळण्यासाठी कुणीही तत्काळ युक्रेनच्या मदतीला आलेले नाही. रशियाने त्याच्या शेजारी देशावर केलेल्या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला असून, युरोपीय महासंघासह इतरांनी रशियाविरुद्ध अभूतपूर्व असे निर्बंध लागू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

युक्रेनबाबत आपण केलेल्या कृतींमध्ये कुणीही हस्तक्षेप केल्यास त्याला इतिहासात कधीही पाहिले नसतील असे परिणाम भोगावे लागतील असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिल्यानंतर; रशियालगतच्या आपल्या पूर्वेकडील मित्रराष्ट्रांतील सैन्यबळ वाढवणअयाच्या हालचाली नाटोने सुरू केल्या असून, शुक्रवारी नाटो नेत्यांची आभासी बैठक बोलावली आहे.

युरोपीय महासंघाचा आणि नाटोचा सदस्य असलेल्या लिथुआनियाने आणीबाणी जाहीर केली आहे. या देशाच्या सीमा नैऋत्येला रशियाच्या कालिनिनग्राड भागाला, तर पूर्वेला रशियाचा मित्रदेश बेलारूसला लागून आहेत. नाटो राष्ट्रांनी रशियाला प्रतिबंध करण्याचा उपाय म्हणून १०० विमाने आणि १२० जहाजे सज्ज ठेवली आहेत.

रशियाने केलेला हा एका स्वतंत्र देशावरील ‘पाशवी हल्ला’ असून त्यामुळे युरोपचे स्थैर्य आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आली आहे, असे युरोपीय आयोगाच्या अधयक्ष उर्सुला वॉन डेर हेयेन यांनी म्हटले आहे. युरोपीय महासंघ ब्रसेल्समध्ये तातडीची बैठक आयोजित करणार आहे.

मात्र परिस्थिती तणावाची झाली असली, तरी युरोपमध्ये मोठे युद्ध भडकण्याच्या भीतीने कुणाही देशाने स्वत:हून लष्करी हालचाल करणअयाचे आणि युक्रेनचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिलेले नाही. त्याऐवजी, चीन वगळता जगातील बहुतांश देशांनी रशियन आक्रमणाचा निषेध केला असून, रशियावर व्यापक आणि केंद्रित निर्बंध लादण्याची धमकी दिली आहे.

चीनने रशियाच्या समर्थनाची भूमिका घेत, संबंधितांना ‘इतरांच्या वैध सुरक्षाविषयक चिंतांचा आदर राखण्याचे’ आवाहन केले आहे. ‘तणाव वाढवण्याऐवजी किंवा युद्धाच्या शक्यतेचे अतिरंजित वर्णन करण्याऐवजी सर्व पक्षांनी शांततेसाठी प्रयत्न करावेत’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनियग म्हणाल्या.

या समस्येवर राजनैतिक तोडगा काढण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणारे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युद्ध छेडण्याच्या रशियाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करतानाच, युक्रेनला मदतीचे आश्वासन दिले.

रशियाला युक्रेनमध्ये सैन्य पाटवण्यापासून परावृत्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची न्यू यॉर्कमध्ये असाधारण तातडीची बैठक झाली. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुट्रेस हे शांतता राखण्याचे आवाहन करत असतानाच, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे रशियन दूरचित्रवाणीवर लष्करी मोहिमेची घोषणा करत होते. कीव्हसह युक्रेनमधील इतर शहरांमध्ये गुरुवारी स्फोटांचे आवाज ऐकू आले. रसियाने युक्रेनच्या सीमांवर दीड लाखांहून अधिक सैनिक गोळा केले आहेत.

युद्धामुळे महागाईचा फटका?

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो. युद्धामुळे काही आवश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नैसगिक वायू, सूर्यफूल तेल, धातू महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा थेट परिणाम खाद्यतेलाच्या किमतीवर होणार आहे. विशेषत: सूर्यफूल तेल, व्यापारी आणि सॉल्व्हेंट उत्पादकांनी हा इशारा दिला आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे किमती वाढत जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.