अवैध खाणकामप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी़ एस़ येडियुरप्पा आणि त्यांच्या दोन पुत्रांना २३ मार्च रोजी येथील विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयापुढे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ येडियुरप्पा यांचे जावई आऱ एऩ सोहन कुमार आणि माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी या अन्य आरोपींनी यापूर्वीच न्यायालयापुढे आपली उपस्थिती लावली आह़े खटल्यादरम्यान न्यायालयापुढे प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याची सवलत मिळविण्यासाठी येडियुरप्पा आणि त्यांच्या पुत्रांनी केलेल्या अर्जावर न्यायालय विचार करणार आह़े परंतु २३ मार्च रोजी मात्र न चुकता उपस्थित राहण्याचे आदेश मुख्य न्यायमूर्ती डी़ ए़ व्येंकट यांनी येडियुरप्पा व बीवाय विजयेंद्र आणि बीवाय राघवेंद्र या त्यांच्या पुत्रांना दिले आहेत़
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2013 रोजी प्रकाशित
येडियुरप्पा पिता- पुत्रांना सीबीआय न्यायालयापुढे उपस्थित राहण्याचे आदेश
अवैध खाणकामप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी़ एस़ येडियुरप्पा आणि त्यांच्या दोन पुत्रांना २३ मार्च रोजी येथील विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयापुढे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़
First published on: 30-01-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yudurappa and his son order to appear before the cbi court