दीपावली (किंवा दिवाळी) अगदी जवळ येऊन ठेपली आहे आणि केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात प्रत्येकजण दिव्यांच्या या सणाची तयारी करण्यात मग्न आहे. बहुसांस्कृतिक समाज या नात्याने सिंगापूरचे नागरिक कायमच त्यांच्या सणांबद्दल उत्साही असतात आणि दिवाळी मोठ्या जोशात व उत्साहात साजरी करतात.

सिंगापूरमधील डझनभर हिंदू कुटुंबिय आपल्या घरे सोनेरी रंगात उजळवतात आणि प्रार्थना करतात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात व प्रियजनांना गोडधोड खाऊ घालतात. दोन सप्टेंबर ते १२ नोव्हेंबर २०१७ दरम्यान लिटिल इंडियाहे आवर्जून भेट देण्यासारखे  आणि सणाचा आनंद घेण्यासाठी आदर्श ठिकाण असते, कारण या दरम्यान दिपावलीनिमित्त सेरंगून रस्ता ते रेस कोर्स रस्त्यादरम्यान संध्याकाळी सात ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दिव्यांची रोषणाई केली जाते.