पुठ्ठे, खळ आणि झिरमिरीत रंगीत कागदांचा वापर करून डोंबिवलीतील ७७ वर्षांचे एक आजोबा गेल्या सात वर्षांपासून पारंपारिक पद्धतीचे आकाशकंदील घरगुती पद्धतीने तयार करीत आहेत. अंगी असलेल्या कौशल्याचा चांगला उपयोग करावा.  कौशल्यातून अन्य कोणाला रोजगार मिळावा, हा या आजोबांचा कंदील पणत्या, चांदण्या बनविण्याचा मुख्य उद्देश आहे. स्वत:कडील आकाशकंदील बनविण्याचे कौशल्य तरुण, तरुणी, महिला बचत गटांनी शिकून त्यांनी स्वसामर्थ्यांवर हा कौशल्याचा व्यवसाय करून स्वत:सह अन्य गरजूंना दोन पैसे मिळविण्यासाठी हातभार लावावा, असे आजोबांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक वर्षांपासून दिवाळी सणात घरोघरी चिनी बनावटीच्या प्लास्टिक चांदण्या, कंदील लावले जातात. हळूहळू या कंदिलांचा एकेक भाग निखळतो. ते प्लॅस्टिक, तो कंदील कचरा म्हणून आपण टाकून देतो. पर्यावरणाचा नाश करणारा घातक प्लॅस्टिक कचरा अशा प्रकारे आपण निर्माण करतो. हे सगळे कोठे तरी थांबले पाहिजे, हाही या उपक्रमामागील आपला उद्देश आहे, असे आजोबांनी सांगितले.

मराठीतील सर्व दिवाळी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 77 year old man selling diwali kandil
First published on: 14-10-2017 at 01:57 IST