18 March 2019

News Flash

गुलजार अक्षरचित्रे!

गुलजार! बहुआयामी प्रतिभेचा धनी.‘मुसाफिर हूं यारों..’ असं आपल्याच मस्तीत गुणगुणत त्यांनी बरीच मुशाफिरी केलीय. साठोत्तरी भारतीय साहित्यातलं ते एक झळाळतं पर्व आहेत. सिनेसृष्टीतलं त्यांचं स्थान तर अनन्यसाधारणच.

| February 20, 2013 08:23 am

गुलजार!
बहुआयामी प्रतिभेचा धनी.‘मुसाफिर हूं यारों..’ असं आपल्याच
मस्तीत गुणगुणत त्यांनी बरीच मुशाफिरी केलीय. साठोत्तरी भारतीय साहित्यातलं ते एक झळाळतं पर्व आहेत. सिनेसृष्टीतलं त्यांचं स्थान तर अनन्यसाधारणच. नुकतीच ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ या प्रतिष्ठेच्या बहुमानासाठी त्यांची निवड झालीय.
गुलजार यांचं ‘डय़ोढी’ हे पुस्तक याच वर्षी प्रकाशित झालं. त्यांचं हे लेखन
रूढार्थाने ‘कथा’ या सदरात मोडत नाही. ही ‘मिनिएचर’ शैलीतली फूलकोमल
अक्षरचित्रं आहेत.. गुलजारांची एकेक कथा म्हणजे नक्षत्रदिवाच! मानवी नातेसंबंधांची मनोज्ञ रेखाटने..
‘ऋतुरंग’तर्फे ‘डय़ोढी’चा मराठी अनुवाद लवकरच प्रकाशित होत आहे. अंबरीश मिश्र यांनी हा अनुवाद केलेला आहे. त्यातल्या पाच कथांचा गुच्छ खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी..

First Published on February 20, 2013 8:23 am

Web Title: gulzar book dyodhi