• डॉ. श्रीराज देशपांडे

वैद्यकीय आपतकालीन स्थिती कधीही निर्माण होऊ शकते हे अलीकडे उदभवलेल्या महासाथीने दाखवून दिले. त्यामुळे एखाद्याने आगामी काळासाठी सज्ज राहिले पाहिजे. युवा वयात वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकत नाही, या तरुणांच्या विचाराला देखील सध्या सुरू असलेल्या महामारी प्रकोपाने छेद दिला आहे. आजच्या घडीला प्रत्येकालाच आरोग्य विम्याचे महत्त्व पटवून घ्यायला परिस्थितीने भाग पाडले आहे. विमा खरेदीमुळे वित्तीय सुरक्षा लाभते. तसेच वैद्यकीय आपतकालीन स्थितीत नितांत आवश्यक असलेली मन:शांती मिळते.  वयाची तिशी गाठेपर्यंत आरोग्य विमा खरेदी कशासाठी आवश्यक आहे, यामागची कारणे पाहूयात:

अल्प प्रीमियम शुल्क: तरुण वयाच्या 25-30 वयोगटातील व्यक्तींमध्ये गंभीर रोगांचे निदान होण्याचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे युवकांना उपलब्ध असलेले विमा प्रीमियम हे प्रौढ वयात विकत घेतलेल्या आरोग्य विम्याच्या तुलनेने अधिक किफायतशीर असतात.

प्रतीक्षा कालावधीचा परिणाम कमी करणे: अनेक विमा योजनांमध्ये समाविष्ट उपचार कवचाकरिता पूर्व-उपलब्ध विकारांसह ठरावीक उपचारांवर विशिष्ट प्रतीक्षा कालावधी असतो. हा प्रतीक्षा कालावधी 30 दिवसांपासून 4 वर्षां पर्यंतचा असून तो आजारानुसार ठरतो. वयाच्या 30 पर्यंत विमा रकमेसाठी दावा करण्याचे प्रमाण अतिशय अल्प असते, व्यक्तीकडे लॉक-इन-पिरीयडकरिता प्रतीक्षा करण्यासाठी पुरेसा वेळ असतो. अशाप्रकारे, आवश्यक असल्यास, दाव्यांची व्याप्ती ही निर्धारित कालावधीनंतर प्रतीक्षा कालावधीच्या पलीकडील असू शकते.

तुमच्या मालकातर्फे देण्यात येणाऱ्या कवचासोबत आणखी एक पूरक पर्याय: तरुण वर्ग नव्याने नोकरी विश्वात पाय ठेवत असल्याने त्यांच्या सर्व वैद्यकीय गरजांकरिता मालकांकडून देण्यात येणारी सामूहिक आरोग्य विमा पॉलिसी पुरेशी आहे अशी बहुतांशी समजूत असते. याप्रकारात प्रीमियमच्या महत्त्वपूर्ण भागाचे ओझे हे मालकाकडून उचललेले जाते. त्यामुळे वेतनधारक कर्मचा-यांवरील आर्थिक भार कमी होतो, मात्र विस्तारीत कवचही मर्यादीत असते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेतल्यास पॉलिसी बंद करण्यात येते. याकरिता स्टँडअलोन हेल्थ इन्शुरन्सचा पर्याय स्वीकारण्याचा पर्याय घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून सर्वांकष तसेच अविरत सुरक्षेची हमी राहील.

रुग्णालय भरती (हॉस्पिटलायजेशन) पलीकडील खर्च समाविष्ट : आजच्या घडीला अनेक आरोग्य पॉलिसींमध्ये डे केअर एक्सपेंन्सेस, होम ट्रीटमेंट, ओपीडी आणि इतकेच काय तर रुग्णालय भरतीचा खर्च समाविष्ट असतो. अनेक योजनांमध्ये मॅटेर्निटी लाभदेखील समाविष्ट असतात. जे आयुष्याच्या या टप्प्यावर उपयुक्त ठरू शकतील. प्रतीक्षा कालावधी संपल्यामुळे भावीकाळात माता बनू इच्छिणाऱ्या विमाधारकांना वित्तीय सुरक्षा लाभते.

कर नफ्यावर दावा करणे: एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय खर्चाच्या झटक्यापासून वाचविण्यासोबत, आरोग्य विमा कर बचतीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो. आरोग्य योजनांकरिता भरण्यात येणाऱ्या प्रीमियमकरिता कलम 80 ड अन्वये करात सूट मिळते. तरीच तुमच्याकडील दाव्याच्या वजावट रकमेवर मर्यादा असतात.

आरोग्य विमा प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. मात्र आयुष्यात कमी वयात तो विकत घेतल्यास त्याचे पुरेसे फायदे मिळू शकतात. तरीही अंतीम निर्णय घेण्यापूर्वी पॉलिसीसंबंधी दस्तावेज काळजीपूर्वक वाचून त्यातील नियम आणि अटी समजून घेणे योग्य असते.

(लेखक फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये चीफ ऑपरेटींग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत)