भारतीय अन्नपदार्थांमध्ये बडीशेपला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वादासाठी अनेक पदार्थांमध्ये वापरली जाणारी बडीशेप जेवणानंतर खाण्याची पद्धत आहे. मात्र जर तुम्ही ती खात नसाल तर त्याचे शरीराला होणारे फायदे समजून घेणे महत्त्वाचे आहे. फायबरचा समावेश असणारा हा पदार्थ अन्नपचन, श्वसनाशी निगडीत तक्रारी अशा अनेक समस्यांसाठी उपयुक्त असतो.

१) अन्नपचन व गॅसेस तक्रारींवर उपयुक्त

how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
100 gram raw garlic revealing impressive impact on our lives how garlic boost your immune system said expert
१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…

बडीशेपमध्ये असणारे घटक खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. यामुळे बद्धकोष्ठता, गॅसेस यांचे त्रास कमी होण्यास मदत होते. बडीशेप ही गॅस कमी करणारी व उत्तम पाचक आहे. याची १-१ सपाट चमचा पावडर जेवणापूर्वी दोन वेळा मधातून घेतल्यास उत्तम भूक लागते. काळ्या मिठाबरोबर याचे चूर्ण जेवणाअगोदर घेतल्यास अन्नपचन चांगले होते. जेवणानंतर पोट फुगणे, रोज पोटात वायू धरून पोट दुखणे थांबते.

२) रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत

बडीशेपमध्ये विशिष्ट प्रकारचे तेल घटक असतात. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास त्याची मदत होते. त्यामुळे रक्तशुद्धीकरणाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने होते.

३) डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. बडीशेपमध्ये याचे प्रमाण जास्त असते. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी अमिनो अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सिडंटसही अतिशय आवश्यक असतात. या सर्व घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

नक्की वाचा >> टाचांच्या भेगांपासून ते मासिक पाळीसंदर्भातील उपचारांपर्यंत… जाणून घ्या कढीपत्त्याचे १५ हून अधिक फायदे

४) वजन घटण्यासाठी उपयुक्त

शरीराचा मेटाबॉलिझम वाढविण्यासाठी बडीशेपचा उपयोग होतो. त्यामुळे वजन घटविण्यासाठी हे अतिशय फायदेशीर असते. लठ्ठपणा कमी करुन शरीरयष्टी सुधारण्यासाठी याचा फायदा होतो.

५) उलट्यांच्या त्रासावर उपायकारक

बडीशेप+साखर चावून खाल्ल्यास उलट्यांचा त्रास कमी होतो.

६) तापात अंगाची आग शांत करण्यासाठी

तापात अंगाची आग होणे, सारखी तहान लागणे, कोणत्याही विकारात शौचाला गेल्यावर किंवा लघवी करताना आग होणे, डोळ्यांची जळजळ, हातापायांची आग होत असेल तर धने, जिरे, बडीशेप व खडीसाखर यांचे पाणी उकळवून, गाळून थंड झाल्यावर घ्यावे.

७) अजीर्णामुळे होणाऱ्या आंव-जुलाबावर उपायकारक

जुलाब होणे, वारंवार थोडे थोडे पोटात मुरडून, चोथा-पाणी सारखे किंवा आंव मिश्रित शौचास होत असेल तर बडीशेप, खसखस, धने, जिरे, सुंठ ही पाच द्रव्ये चहासारखी पाण्यात उकळवून गाळून ते पाणी सकाळ-संध्याकाळ घ्यावे. अजीर्णामुळे होणाऱ्या आंव-जुलाबावर अप्रतिम औषध आहे.

नक्की वाचा >> सकाळी चहाऐवजी एक ग्लास हळदीचं पाणी प्यायल्यास होणारे पाच फायदे वाचून थक्क व्हाल

८ ) उत्तम बुद्धिवर्धक

एक ग्रॅम बडीशेप चूर्ण एक चमचा मधात मुलांना दररोज सकाळी चाखावे. उत्तम बुद्धिवर्धक योग आहे.