28 November 2020

News Flash

दररोज करा ६३ रुपयांची गुंतवणूक, मिळवा ७ लाखापर्यंत रिटन्स

LIC Jeevan Anand :

LIC Jeevan Anand : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) नागरिकांसाठी विविध पॉलिसी आंमलात आणते. या पॉलिसी वेगवेगळ्या वर्गाला समोर ठेऊन तयार करण्यात आलेल्या असतात. लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंत एलआयसीमध्ये विविध प्रकारच्या पॉलिसी आहेत. ग्राहकांना भविष्यात मोठी रक्कम जमा होईल अशा पद्धतीनं या पॉलिसींना डिजाइन केलेलं आहे. एलआयसी ग्राहकां टर्म प्लॅन, जीवन वीमा आणि एंडोमेंट प्लॅनसारख्या इतर पॉलिसी देते. आज आपण एलआयसीच्या जीवन आनंद या पॉलिबद्दल जाणून घेणार आहोत. फेब्रुवारी २०२० मध्ये जीवन आनंद (टेबल नंबर ९१५) या पॉलिसाला लाँच करण्यात आलं आहे.

सर्वाधिक विक्री होणाऱ्या पॉलिसीपैकी जीवन आनंद एक पॉलिसी आहे. ही पॉलिसी एडोमेंट आणि लाइफ प्लानचं मिश्रण आहे. याअंतर्गत पॉलिसी पीरिअडच्या समाप्तीनंतर मॅच्योरिटीवर रिटर्न तर मिळतोच शिवाय जीवनभर सम एश्योर्ड (लाइफ लॉन्ग कवरेज) ही मिळतोय. ज्यांना गुंतवणुकीनंतर बक्कळ रक्कम रिटन्स हवी त्यांच्यासाठी जीवन आनंद पॉलिसी फायद्याची आहे.

आणखी वाचा : जीवन लाभ विमा : दररोज करा २३३ रुपयांची गुंतवणूक, मिळवा १७ लाखापर्यंत रिटन्स

पॉलिसी घेण्याचे नियम व अटी –
१) १८ ते ५० वयाची व्यक्ती या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता येईल.
२) हा एक लॉन्ग टर्म प्लान आहे. यामधये पॉलिसीधारक १५ ते ३५ वर्षाच्या टर्म प्लानला निवडू शकतात.
३) कमीत कमी एक लाख रुपयांच्या सम एश्योर्डसह या पॉलिसीला खरेदी केलं जाऊ शकतं.
४) अधिकच्या सम एश्योर्डची कोणतीही अट नाही.
५) बोनसची सुविधाही मिळते.

उदाहरण म्हणून समजून घ्या…
वय : २६
टर्म : २०
डीएबी : ४,००, ०००
डेथ सम एश्योर्ड : ५,००,०००
बेसिक सम एश्योर्ड : ४,००,०००

पहिल्या वर्षी प्रिमिअम ४.५ टक्के टॅक्ससह
वार्षिक: 23857 (22830 + 1027)
अर्धवार्षिक: 12052 (11533 + 519)
त्रैमासिक: 6087 (5825 + 262)
मासिक: 2029 (1942 + 87)
वायएलवी मोड एवरेज प्रीमियम/प्रतिदिन: 65

आणखी वाचा : LIC च्या पॉलिसीमध्ये दिवसाला १५४ गुंतवा अन् मिळवा १९ लाख

पहिल्या वर्षीच्या प्रिमिअमनंतर २.५ टक्केंच्या टॅक्ससह –

वार्षिक: 23344 (22830 + 514)
अर्धवार्षिक: 11792 (11533 + 259)
त्रैमासिक: 5956 (5825 + 131)
मासिक: 1986 (1942 + 44)
वायएलवी मोड एवरेज प्रीमियम/प्रतिदिन: 63

अंदाजे एकूण देय प्रिमियम: 467393

मॅच्योरिटीच्यावेळी अंदाजे रिटर्न :
सम एश्योर्ड: 400000
बोनस: 336000
फायनल एडिशनल बोनस: 28000

मॅच्योरिटीच्यावेळी एकूण मिळणारी अंदाजे रक्कम : 764000+ 400000 रुपयांचा लाइफ टाइम रिस्क कव्हर

समजा एखादा व्यक्ती २६ व्या वर्षी ४,००,००० रुपयांचं सम एश्योर्डची निवड करत २० वर्षाचा टर्म प्लॅनमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केल्यास. पहिल्यावर्षी त्या व्यक्तीला २३,३४४ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच त्याला प्रत्येक दिवसाला ६५ रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर दुसऱ्यावर्षी प्रिमिअममध्ये घट होईल. कारण तुमचा टॅक्स दर २.२५ टक्के होईल. त्या व्यक्तीला दुसऱ्या वर्षी प्रत्येक दिवसाला ६३ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हा प्रिमिअम २० वर्षांपर्यंत भरावा लागेल. त्यानंतर मॅच्योरिटीवर ७, ६४, ००० रुपये मिळतील.

आणखी वाचा : दररोज ११४ रुपये गुंतवा अन् मिळवा २६ लाखांचा परतावा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 9:55 am

Web Title: lic jeevan anand get rupees 7 lakhs easily by invested 63 rupees daily nck 90
Next Stories
1 पैसे दुप्पट करायचेत? Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक
2 अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या
3 US Election : समजून घ्या काय आहे EARLY BALLOTS CAST सिस्टम
Just Now!
X