वाढत्या उकाडय़ाने अगदी अंगाची लाहीलाही होत आहे. निथळणाऱ्या घामाच्या धारांमुळे सारेच त्रस्त आहेत. घाम हा सर्वानाच येतो, काहींना कमी, काहींना जास्त. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी घाम येत असला तरी अतिरिक्त घाम येणे किंवा घामच न येणे हे आरोग्यासाठी बाधक आहे. घामामुळे त्वचेचे विविध विकारही उद्भवतात. त्यामुळे शरीराची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे.

घाम का येतो?

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?

उष्णतात नियमन:

शरीराचे तापमान नियमित करण्यासाठी.

हाता-पायांच्या तळव्यांचा ओलावा, मऊपणा टिकवण्यासाठी.

विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकण्यासाठी :

लहान मुलांमधील ‘अटोपिक डरम्याटायटिस’मध्ये घाम रोगप्रतिकारक शक्तीच्या रूपात महत्त्वाचे काम करतो, असे संशोधनात आढळले आहे.

विविध कारणांनी विविध जागी येणारा घाम –

सर्वांगाला : उष्ण दमट वातावरणात व्यायामामुळे, पॅरासिटामॉलसारख्या औषधाने, ताप तसेच हायपर थायरॉइड, कर्करोग, मधुमेह, मणक्याची दुखणी यात सर्वागाला घाम आलेला आढळतो.

विविष्ट स्थानी येणारा घाम : नागीन, कानाभोवती, मेंदूला येणारी सूज यात विशिष्ट ठिकाणी घाम येतो.

विकार आणि उपाय

हातापायाच्या तळव्यांना येणारा घाम – हातापायाला येणाऱ्या घामाने कधी कधी लाजिरवाणे वाटते. लहानपणी किंवा कुमारवयात हे आढळून येते.

उपाय- अल्युमिनियम हाइड्रोक्लोराइट लोशन, बोटॉक्स इंजेक्शन

काखेत येणारा घाम –

१५ ते १८ वयोगटात साधारणपणे हे दिसून येते. यात विशिष्ट प्रकारची दरुगधी व सेकंडरी इन्फेक्शन (दुसऱ्यांदा होणारा संसर्ग) आढळते हे आनुवांशिकही असू शकते.

उपाय : अँटिफंगल पावडर किंवा बोटॉक्स इंजेक्शन

तिखट गरम जेवण टाळल्यास त्यामुळे येणारा घाम टाळता येऊ शकतो.

रात्री येणारा घाम : क्षय, कर्करोग, मधुमेह, रजोनिवृत्तीपूर्वीच्या व्यक्तींमध्ये रात्री घाम येण्याचे प्रमाण आढळते.

उपाय : अँटिकोलिनेर्जिक ड्रग्स जसे की अ‍ॅट्रोपीन अ‍ॅनालॉग्स, सिडेटिव्हज ट्रॅम्क्वीलायझरस, क्लोरिडाइन हायड्रोक्लोराइड, आयोन्टोफोरिसिस बोटॉक्स किंवा बोटुलियम टॉक्झिन सर्जरी.

हायपोहायड्रोसिस : हे फार क्वचितच आढळते. औषधांच्या सेवनामुळे घर्मग्रथींचे नुकसान होते आणि हा विकार होतो. कोरडी त्वचा असेल तरी हा विकार होतो.

नक्की वाचा >> जाणून घ्या: अ‍ॅसिडिटी कशामुळे होते?; अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी काय करता येईल?

उपाय : थंड पाण्याची बंडी डॉक्टर वापरायला सांगतात.

नायटा (फंगल इन्फेक्शन) : वाढते तापमान, दमट हवा यामुळे येणारा घाम व उष्णता त्यातून होणारे घर्षण यामुळे नायटाचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या युगात घट्ट जीन्स घालण्याचे प्रमाण वाढले आहे. ही विजार नायटा येण्यास कारणीभूत ठरते.

थोडक्यात घाम हे शरीरातील नैसर्गिक कार्य आहे. कधी कधी अतिघामाने त्रासदायक व लाजिरवाणे वाटते, तरी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन उपाय केल्यास उद्भवणाऱ्या समस्येवर मात करता येईल.

विविध शारीरिक प्रेरणांमधून घाम येतो, जसे की..

उष्णतामान : कमी-अधिक शारीरिक उष्णतेने चेहरा आणि शरीराला घाम येतो.

भावनिक बदल : भीती किंवा तणावाने मुख्यत: परीक्षेला जाणारे विद्यार्थी, प्रसंगाला सामोरे जाणारी व्यक्ती यांच्यी तळहाताला किंवा तळपायाला घाम सुटतो.

स्वादइंद्रिय : तिखट चमचमीत, गरम जेवताना बऱ्याचदा कपाळ, नाक व ओठाच्या जवळपास घाम येतो.

नक्की वाचा >> समजून घ्या सहजपणे : तुम्हाला करोना फोबियानं ग्रासलं आहे का?

घामातील घटक :

सोडियम, पोटॅशियम, क्लोराइट, लॅक्टेट, युरिया, अमोनिया, अमायनो अ‍ॅसिड.

बाह्य़ त्वचा वृद्धी घटक : अनियंत्रित मधुमेहींमध्ये त्वचा संक्रमण आढळून येते.