एसबीआय, एचडीएफसी, एक्सिस, बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय अशा देशभरातील आघाडीच्या बँकामध्ये झिरो बॅलेन्स बचत खाते उघडण्याची सुविधा दिली जाते. एसबीआयच्या बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट (BSBD) खात्याला सामन्यपणे झिरो बॅलेन्स बचत खाते म्हणून ओळखले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना सक्षम करण्यासाठी बँकेकडून झिरो बॅलेन्स बचत खाते सुरू करण्यात आले आहे. जाणून घेऊयात झिरो बॅलेन्स बचत खात्याबद्दलच्या दहा गोष्टी ….

१ ) नो-युवर-कस्टमर (KYC) कागदपत्रे असणारा कोणतीही व्यक्ती एसबीआयचे झिरो बॅलेन्स बचत खाते उघडू शकतो.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

२ ) एसबीआयचे झिरो बॅलेन्स बचत खाते स्वतंत्र किंवा संयुक्तरित्या (जॉइंट) उघडले जाऊ शकते.

३ ) झिरो बॅलेन्स बचत खात्यात शुन्य रूपये असले तरीही कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कारण झिरो बॅलेन्स बचत खात्यामध्ये कमीत कमी रक्कम (Minimum balance) ठेवायची कोणतीही सक्ती नसते.

४ ) नियमित बचत खात्याएवढेच व्याज (Interest) एसबीआयच्या झिरो बॅलेन्स बचत खातेधारकांना मिळतो. एक लाखांपेक्षा कमी जमा रकमेवर एसबीआय वार्षिक ३.२५ टक्के व्याज देतेय.

५ ) एसबीआयच्या झिरो बॅलेन्स बचत खातेधारकांना चेकबुकची सुविधा मिळत नाही.

६ ) एसबीआयच्या झिरो बॅलेन्स बचत खातेधारकांचे बँकेत इतर अन्य बचत खाते नसले पाहिजे, ही अट आहे.

७ ) एखाद्या ग्राहकाचे एसबीआयमध्ये बचत खाते असेल. तरीही त्याला झिरो बॅलेन्स बचत खाते उघडायचे असेल, तर त्या ग्राहकाला झिरो बॅलेन्स खाते उघडण्यापूर्वी तीस दिवस आधी बचत खाते बंद करावे लागेल.

८) झिरो बॅलेन्स खातेधारकांना महिन्यातून फक्त चार वेळा पैसे काढता येतात.

९) एसबीआयकडून झिरो बॅलेन्स खातेधारकांना मोफत दिल्या जाणाऱ्या रूपे कार्डला (RuPay ATM-cum-debit card) कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जात नाही.

१० ) एसबीआयचं निष्क्रिय खाते चालू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.