scorecardresearch

“दारू प्यायल्यावर Ex आठवते कारण…” तज्ज्ञ सांगतात, आपण नशेत सगळं विसरून का जातो

Facts Hangover: … यामुळे अनेकदा जुन्या आठवणींचा गुंता होणे, स्वप्नात दिसलेल्या या गोष्टी दिसणे असे प्रकार होऊ शकतात.

Alcohol Erase Memory Why we forget What happen in Night Sleep and Miss our ex after getting drunk Alcohol Blackout Facts
दारू प्यायल्यावर Ex आठवते कारण…(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Why Do We Forget After Drinking Alcohol: दारू प्यायलेल्या माणसाला नेहमी असं म्हंटलं जातं की, “आता जे बोलतोयस ना ते उद्या बोलून दाखव…” याचा अर्थ काय तर बहुतांशवेळा दारू प्यायल्यावर माणसाला आपण काय करतोय याचे भान उरत नाही. अनेकजण तर दारूच्या नशेत अगदी गोंधळ घालताना तुम्हीही पाहिले असेल. खरंतर अलीकडेच असाच एक प्रकार मेट्रोमध्ये सुद्धा घडला आहे. एका बेवड्याने चक्क मेट्रोत वाद घालून सगळ्यांची झोप उडवली होती पण खरी गमंत अशी की त्यानंतर या महाभागाने चक्क प्रवाशांचे पाय धरले आणि गप्पा मारू लागल्या. आता तुम्हीच सांगा जर हे सगळं नशा उतरल्यावर त्याच्या लक्षात असेल तर किती खजील झाल्यासारखं होईल? पण सुदैवाने- दुर्दैवाने अनेकदा दारू प्यायल्यावर माणूस अनेक गोष्टी विसरून जातो. पण हे असं का होतं हे तुम्हाला माहित आहे का? अलीकडच्या एका अभ्यासात याविषयी उलगडा झाला आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टटयूट ऑफ एल्कोहल एब्यूज अँड एल्कोहलिज़्म या संस्थेतर्फे एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. यामध्ये अल्कोहोल ब्लॅक आउट याविषयी माहिती देण्यात आली. बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही कमी प्रमाणात जरी दारूचे सेवन केले तरी अल्कोहोल ब्लॅक आउट होण्याची शक्यता असते. यासाठी १००० प्रतिनिधींसह संशोधन करण्यात आले होते. यातील तब्बल ६६.४ टक्के लोक कमी अधिक प्रमाणात दारू प्यायल्यावर ब्लॅकआउट अनुभवतात असे समोर आले होते.

जर्मन न्यूज़ वेबसाइट डीडब्ल्यू च्या अहवालानुसार, हाइडेलबर्ग विद्यापिठाने दारूने मानवी मेंदूवर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला होता. दारू प्यायल्यावर एकाग्रता व समज कमी होते. तसेच तुमच्या स्मरणशक्तीवर सुद्धा प्रभाव वाढत जातो.

हे ही वाचा<< मेट्रोमध्ये चढला बेवडा! आधी भांडला मग प्रवाशांच्या पाया पडून असं काही बोलू लागला की… Video पाहून खूप हसाल

हाइडेलबर्ग यूनिवर्सिटी के रिसर्चर हेल्मुट जाइत्स यांनी सांगितले की. दारूमध्ये एथेनॉल असते. हा घटक शरीरात पोहोचताच आपल्या रक्त व पाण्यामध्ये विरघळतो. मानवी शरीराचा ७० ते ८० टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे. यामुळेच पाण्यातून व रक्तातून एथेनॉल सहज मेंदूपर्यंत पोहोचतो. याचा प्रभाव आपल्या मेंदूच्या न्यूरोट्रांसमीटर वर होऊन मेंदूची नियंत्रण क्षमता कमी होऊ लागते. यामुळे अनेकदा जुन्या आठवणींचा गुंता होणे, स्वप्नात दिसलेल्या या गोष्टी दिसणे असे प्रकार होऊ शकतात. यामुळेच तुम्ही सध्या काय सुरु आहे हे विसरून जाऊ शकता. या विसरण्याचा प्रक्रियेला अल्कोहोल ब्लॅकआऊट असे म्हणतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 18:14 IST

संबंधित बातम्या