scorecardresearch

Premium

व्हिस्की, वोडका, रम, वाईन, बिअरमध्ये नेमका फरक काय? काय प्यायल्याने चढते अधिक नशा? जाणून घ्या…

मद्याच्या प्रत्येक प्रकारात अल्कोहोलचे प्रमाण वेगळे असते. तसेच ते बनवण्याच्या पद्धतीतही फरक असतो. त्यामुळे प्रत्येक मद्याचा रंग, चव वेगळी असते.

difference between whiskey vodka rum wine beer which one is more intoxicating
व्हिस्की, वोडका, रम, वाईन, बिअरमध्ये नेमका काय फरक? काय प्यायल्याने चढते अधिक नशा? जाणून घ्या (photo – freepik)

तुम्ही रम, व्हिस्की, वोडका, बिअर, वाईन या अल्कोहोलच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल कधी ना कधी ऐकलेच असेल. पण, जे लोक ड्रिंक करत नाहीत त्यांना याबाबत फारशी माहिती नसते. तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, वाइन, व्हिस्की, वोडका, बिअर ह्यात नेमका काय फरक आहे? त्यात कोणत्या प्रकारची नशा असते? यात अनेकांना मद्याचे फार कमी प्रकार माहीत असतात. परंतु, मद्य वेगवेगळ्या प्रकारात मिळते आणि या सर्व प्रकारात अल्कोहोलचे प्रमाणही वेगळे असते. याशिवाय प्रत्येक प्रकार बनवण्याच्या पद्धतीतही फरक असतो. अल्कोहोलचे प्रमाण आणि तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे अल्कोहोलच्या प्रकाराचा प्रभावदेखील बदलतो. याशिवाय प्रत्येकाच्या चव आणि रंगात फरक असतो. लोक त्यांच्या आवडीनुसार कॉकटेलसाठी एक किंवा दोन-तीन प्रकारचे मद्य निवडतात.

रम

रममध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूप जास्त असते. यात ४० टक्क्यांहून अधिक अल्कोहोल असते. पण, मद्याच्या या प्रकाराची किंमत तुलनेने फार कमी असते. बहुतेक लोकांना हिवाळ्यात रम प्यायला आवडते. रम बनवण्यासाठी सर्वप्रथम उसाचा रस आंबवला जातो. यानंतर त्याचे डिस्टिलेशन केले जाते. जळलेल्या ओक किंवा लाकडी बॅरलमध्ये रम काही काळ साठवली जाते, ज्यामुळे तिचा रंग गडद होतो आणि चव अधिक तीव्र होते. काही वेळा रंग आणि चवीसाठी रममध्ये गूळ, जळलेली साखर किंवा कॅरॅमेल मिक्स केले जाते.

Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार
try these five amazing use of eggshells tips
आज अंड्याचा नव्हे, तर त्याच्या ‘कवचांचा’ फंडा पाहू! कचऱ्यात फेकून देण्याआधी या पाच टिप्स पाहा
What is millet milk
मिलेट्स दूध म्हणजे काय? रोजच्या आहारात सेवन करू शकता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे
Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….

काय सांगता! हाय हिल्स प्रथम पुरुषांसाठी अस्तित्त्वात आल्या होत्या, वाचा रोमांचक गोष्ट

वोडका

पाण्याप्रमाणे पारदर्शक दिसणार्‍या वोडकामध्ये ६० टक्के अल्कोहोल असते, त्यामुळे त्याची नशा अधिक चढते आणि दीर्घकाळ टिकते. रशिया आणि पूर्व युरोपमध्ये वोडक्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मद्याचा हा प्रकार धान्य आणि ऊसाच्या मळीपासून बनवला जातो. वोडका कोणत्याही स्टार्च किंवा साखरेपासून बनवता येतो. आजकाल धान्य, ज्वारी, कॉर्न किंवा गव्हापासून वोडक्याचे अनेक प्रकार बनवले जातात. गव्हापासून बनवलेला वोडका सर्वोत्तम मानला जातो.

वाईन

वाईन लाल आणि पांढर्‍या रंगात येते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण फार कमी असते. त्याची चवही अगदी सौम्य असते. वाईनमध्ये ९ ते १८ टक्के अल्कोहोल असते. ती बनवण्यासाठी प्रामुख्याने द्राक्षांचा वापर केला जातो. रेड वाईन लाल किंवा काळ्या द्राक्षांच्या लगद्यापासून बनविली जाते. द्राक्षाची सालं आंबवून वाईन बनवली जाते, तर व्हाईट वाईन द्राक्षांच्या आंबवलेल्या रसापासून बनविली जाते. यासाठी द्राक्षाचा रस काढला जातो, पण यात सालींचा वापर केला जात नाही.

व्हिस्की

गहू आणि बार्लीसारख्या धान्यांपासून व्हिस्की बनविली जाते. त्यात ३० ते ६५ टक्के अल्कोहोल असते. व्हिस्कीमध्ये साधारणपणे ४० टक्के अल्कोहोल असते. युरोपमध्ये व्हिस्कीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. व्हिस्की तयार करण्यासाठी बार्ली किंवा गव्हाच्या उगवणातून प्राप्त झालेला एक पदार्थ आंबायला जातो. यानंतर त्यातून मिळणाऱ्या द्रावणाचे डिस्टिलेशन केले जाते. काही व्हिस्की बनवण्यासाठी बार्ली, गहू किंवा राय नावाचे धान्य ग्राउंड करून त्यात पाणी आणि यीस्ट मिसळले जाते.

बिअर

जव, तांदूळ आणि मक्यापासून बिअर बनविली जाते. तिन्हींचे मिश्रण गरम पाण्यात भिजवून मग त्याचे चांगले मॅशिंग करून त्यातून द्रव पदार्थ काढला जातो. यानंतर तो द्रव पदार्थ हॉप्समध्ये मिसळून उकडून घेतला जातो, मग तो थंड केला जातो. यानंतर त्यात ऊसाची मळी टाकून आंबवलं जातं आणि नंतर गाळले जाते आणि बिअर बनवली जाते. बिअरमध्ये जास्तीत जास्त १० टक्के अल्कोहोल असते, त्यामुळे त्याचा प्रभावही सौम्य राहतो. परंतु, जास्त बिअर प्यायल्यास त्याची तीव्र नशा चढते,

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Difference between whiskey vodka rum wine beer which one is more intoxicating sjr

First published on: 29-10-2023 at 15:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×