Who invented the safety pin सेफ्टी पिन ही रोजच्या आयुष्यातील इतकी नगण्य वस्तू आहे की तिचा फारसा कोणी विचारही करत नाही. पण एखादा कपडा किंवा साधी पायातली चप्पल तुटली तरी आपण लगेचच तात्पुरती सोय म्हणून शेजारच्याकडे सेफ्टी पिन मागतो. हा लहानसा पिन खांद्यावरील पदर तर ढळू देतच नाही परंतु एखाद्याला जखमीही करू शकतो इतकी प्रचंड ताकद त्याच्यात आहे. याच पार्श्वभूमीवर या सेफ्टी पिनचा शोध कोणी लावला? हे जाणून घेणे नक्कीच रंजक ठरणारे आहे.    

अधिक वाचा: कुत्र्यांना गुन्हेगाराचा सुगावा कसा लागतो?

कपड्याच्या दोन तुकड्यांना जोडण्यासाठी पिनचा वापर साडेतीन हजार वर्षांपूर्वी केला गेल्याचे संदर्भ इतिहासात सापडतात; पण ती पिन आजच्या सेफ्टी पिन सारखी नव्हती. आजच्या सेफ्टी पिनचा शोध अलीकडचा म्हणजे १९ व्या शतकातला आहे; या पिनचा शोध वॉल्टर हंट याने लावला. १८ व शतक सरता सरता न्युयोर्कमध्ये जन्माला आलेला वॉल्टर खर तर गवंडी काम शिकला होता; पण त्याच मन सदैव कोणत्या ना कोणत्या समस्यांवर तोडगा काढण्यात गुंतलेलं असायचं. यातूनच त्याने नवनवीन साधनांचा शोध लावला होता.

एकदा त्याने आपल्या मित्राशी कशावरून तरी पैज लावली होती आणि तो ती पैज हरला. पैजेत हरलेली रक्कम तशी शुल्लकच होती. केवळ १५ डॉलर्स त्याला आपल्या मित्राला द्यायचे होते. परंतु त्यावेळी त्याच्याकडे तेवढीही रक्कम नव्हती. हे पैसे कसे मिळवावे या विवंचनेत असतानाच त्याच्या हाती लागलेल्या तारे बरोबर तो निरनिराळे चाळे करून ती वाकावण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या हातातील तारेकडे त्याच लक्ष नव्हतच. परंतु त्याने अनावधानाने तयार केलेल्या तारेच्या आकाराकडे पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. त्या रचनेत वेगवेगळे बदल करून त्या तारेला त्याने सेफ्टी पिनचा आकार दिला आणि सेफ्टी पिनचा शोध लागला. त्याने या पिनचे सर्व हक्क ज्या मित्राबरोबर तो पैज हरला त्या मित्राला केवळ ४०० डॉलर्समध्ये विकून टाकले. आज जगात अनेकांना या इटुकल्या पिनमुळे बराच आर्थिक फायदाही झाला आहे.

अधिक वाचा: चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० एप्रिल १८४९ रोजी वॉल्टरला  सुधारित पिनच पेटंट मिळाल. या पिनमध्ये वाकवलेल्या तारेच्या एका टोकाला एक हलकीशी स्प्रिंग बसवली होती. त्यामुळे मग तिचं दुसर टोक जरा दाबून एका चिमट्यात अडकवता येत होत. पुन्हा तेच टोक जरा दाबून एका चिमट्यात अडकवता येत होत. पुन्हा तेच टोक दाबलकी पिन मोकळी होत होती. बोटाला इजा न होता ती पिन वापरता येत असल्याने तिचं नाव ‘सेफ्टी पिन’ अस पडलं.