PAN Card: देशात आधारकार्ड जितके महत्वाचे आहे तितकेच पॅन कार्डही (PAN Card) महत्वाचे आहे. पॅन कार्ड किंवा परमनंट अकाऊंट नंबर हे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हा पॅन क्रमांक दहा अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांकासह येतो. त्याचा वापर केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही. पॅन कार्ड हे असे दस्तऐवज आहे जे आयकर विभागाला सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यात मदत करते. पण काही वेळा पॅनमधील आडनाव बदलण्याची गरज भासते. पॅनकार्डवरील हे सोपे बदल करण्यासाठीही नागरिक बऱ्याचदा गोंधळतात. मात्र, हे आडनाव बदलणे अगदी सोपे आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या पॅनकार्डवरील आडनाव बदलू शकता.

आडनाव बदलासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Solar Ac That Does Cooling at Home Using Sun Energy Cost of Ac for 1 to 1.5 Ton
सोलार एसी वापरून सूर्यावर खेळ रिव्हर्स कार्ड! किंमत, फायदे पाहाच, आधीच घरी एसी असल्यासही करू शकता जुगाड
olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
  • पॅनकार्डवर तुमचे आडनाव बदलण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://onlineservices.nsdl.com/paam/ या वेबसाइटला भेट द्यावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरावा लागेल. समोर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये तुम्हाला आवश्यक ती माहिती भरावी लागेल.
  • या स्टेपच्या दुसऱ्या टप्प्यात हा फॉर्म ऑनलाईन सबमिट करावा लागेल. आता तुम्हाला तुमच्या नावापुढे असणारा ऑप्शन निवडावा लागेल आणि या फॉर्ममध्ये तुमचा पॅन नमूद करावा लागेल.

आणखी वाचा : Sim Card Rule: आता ‘या’ कागदपत्रांवर घेता येणार नाही सिमकार्ड; सरकार आणणार नवीन नियम; जाणून घ्या काय आहे कारण…

  • पुढे येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी करावी लागेल. पडताळणी झाल्यानंतर व्हॅलिडेटवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करावे लागणार आहे.
  • तुमच्या पॅनकार्डवरील अडनाव बदलण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागेल. मात्र यासाठी तुम्हाला पैसे देखील द्यावे लागणार आहे. तुम्ही हे पैसे नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि कॅश कार्डद्वारे करू शकतात.

हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पॅन अर्ज डाऊनलोड करून तो भरावा लागेल. त्यानंतर त्याची प्रिंट काढून पासपोर्ट फोटो चिकटवून फॉर्मवर स्वाक्षरी केली असल्याची खात्री करा. फॉर्मसह, तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची स्व-प्रमाणित करणे देखील आवश्यक आहे. याशिवाय, जर तुम्ही NSDL साठी अर्ज केला असेल, तर हा अर्ज देखील NSDL कडे पाठवावा लागेल.