झोपेत आपल्याला वेगवेगळी स्वप्न पडत असतात. कधी ही स्वप्न चांगली असतात तर कधी खूप भयानक. पण अनेकदा झोपेत आपल्याला अचानक एका उंचावरून धाडकन खाली पडल्याचे स्वप्न पडले आणि झोपेतून पटकन जाग येते. पण झोपेतून उठल्यानंतर पाहतो तर आपण बेडवरच असतो. अशावेळी अनेकदा मनात प्रश्न येतो की, असे का होते? जर तुम्हाला या मागचे कारण माहित नसेल तर आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.

वास्तविक या परिस्थितीला हिपनिक जर्क असे म्हणतात. स्वप्नातील अशा धक्क्यामुळे तुम्हाला झोपेतून अचानक जाग येते. यावेळी वास्तव आणि स्वप्नातील फरक काही वेळ ओळखता येत नाही.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

मेंदू शरीरावर नियंत्रण ठेवतो.

आपल्या मेंदूला सतत शरीरावर नियंत्रण ठेवण्याची सवय असते. यात मेंदूला शरीराच्या प्रत्येक अवयवाची माहिती असते. आपण जेव्हा श्वास घेतो, केव्हा झोपतो, केव्हा उठतो याची सर्व माहिती मेंदूकडे असते. यात मेंदू एका चौकीदारासारखे काम करते. आपले कोणत्याही संकाटापासून संरक्षण करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. धोक्याची जाणीव झाल्यावर आपल्या बचावासाठी तो शरीरातील प्रत्येक अवयवांना सिग्नल पाठवते.

हिपनिक जर्क हा देखील याच्याशी संबंधित आहे. जेव्हा आपण झोपेलेले असतो तेव्हा आपल्याला पडल्यासारखे वाटते. कारण यादरम्यान आपले डोळे बंद असतात आणि ह्रदयाचे ठोके मंदावतात तेव्हा अनेक वेळा मेंदू गोंधळून जातो.आपण मरत तर नाही ना असे आपल्या मेंदूला वाटू लागते आणि तो लगेच हालचाली करु लागतो.

यावेळी आपल्याला जागे करण्यासाठी मेंदू एक अतिशय स्मार्ट मार्ग अवलंबतो, ज्यात तो स्वप्नात अशी प्रतिमा तयार करतो ज्यामध्ये आपण उंच जागेवरून, शिडीवरून किंवा धोकादायक ठिकाणावरून पडत आहोत असा भास होतो. अशा स्थितीत मेंदू अचानक पायांना सिग्नल पाठवतो. सिग्नल मिळताच आपल्याला एका धक्क्याने जाग येते. अशाप्रकारे मेंदूचे कार्य पूर्ण होते. जागे झाल्यानंतर आपल्या मेंदूला आपण जिवंत असल्याचे समाधान मिळते. यानंतर सर्व स्थिती सामान्य झाल्यानंतर काही वेळाने पुन्हा आपल्याला झोप येते.