हळू हळू विचारपूर्वक चाली चलत खेळला जाणारा हा खेळ फार प्रसिद्ध आहे. खूप हुशार असणारेच हा खेळ खेळू शकतात असही म्हंटल जात. हा खेळ म्हणजे रणनीती आणि चातुर्य याचा योग्य मेळ घालून खेळला जाणारा खेळ आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन हा २० जुलैला साजरा केला जातो. हा एक बुद्धिबळ फार जुना खेळ आहे.  या खेळाचे फायदेही आहेत. ह्या खेळामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि चिंतेची भावना कमी होण्यास मदत होते. FIDE  म्हणजे ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचा इतिहास

FIDE च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून बुद्धिबळ खेळला जात आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला होता. चतुरंग हे बुद्धिबळाचंच प्राथमिक रूप. बुद्धिबळांचा शोध साधारणपणे गुप्ता काळात झाला. त्यावेळी त्याचे नाव चतुरंग असे ठेवलेले होते. हा काळातील सर्वात जुना खेळ आहे यात काही शंका नाही. नंतर हा खेळ पर्शियात पसरला. अरबांनी पर्शियावर विजय मिळवला तेव्हा बुद्धिबळ हा मुस्लिम लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आणि तेथून तो दक्षिण युरोपमध्ये पसरला. युरोपमध्ये बुद्धिबळ सध्याच्या स्वरूपात विकसित झाले. आणि नंतर त्याला आधुनिक खेळाचे रूप मिळाले.

Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
Office of ED and National Investigation Agency in BKC mumbai
ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला
Dead body of tiger in suspicious condition near international cricket stadium
नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमजवळ वाघाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह

आता हा खेळ अधिक लोकप्रिय झाला आहे. २० जुलै, १९४२ रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या आठव्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये, फिड म्हणजेच जागतिक बुद्धीबळ फाउंडेशनची स्थापना झाली. आणि २० जुलै, १९६६ पासून, आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन फिडच्या स्थापनेचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यास सुरवात झाली. २० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन साजरा करण्यासाठी युनेस्कोने प्रस्ताव दिला होता. संपूर्ण जगात आता बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात. १८५१ मध्ये लंडनमध्ये पहिली आधुनिक बुद्धिबळ स्पर्धा झाली आणि ती जर्मन अ‍ॅडॉल्फ अँडरसनने जिंकली.

बुद्धिबळ खेळाशी संबंधित तथ्य

– बुद्धीबळ हा एक मानसिक खेळ आहे.

– बुद्धिबळचा सर्वात जास्त वेळ खेळला जाऊ शकणारा खेळ आहे. यामध्ये ५,९४९ एवढ्या चाली आहेत.

– “चेकमेट” हा शब्द “शाह मॅट” या अरबी शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ “राजा मेला आहे” असा होतो.

– स्पेनमध्ये १२८०  मध्ये, नवीन हालचाल सुरू केली गेली जिथे मोहरा एका ऐवजी दोन स्टेप हलवला जाऊ  शकेल.

– जर्मन डॉ. इमानुएल लस्करने २६ वर्षे आणि ३३७ दिवस विजेतेपद कायम राखले होते.

– युरोपमध्ये १०९० मध्ये  आज आपण पहात असलेले आधुनिक चेसबोर्ड प्रथमच दिसले.

– ११२५ मध्ये फोल्डिंग चेसबोर्डचा शोध लागला.

– आधी खेळाडूंना “रुकीज” म्हणून ओळखले जात असे.