International Joke Day निमित्त जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास

आज आंतरराष्ट्रीय विनोद दिन असून त्यानिमित्ताने जाणून घेऊयात इतिहास आणि आनंदी राहण्याचं महत्व

International Joke Day
जोक्स नेगेटिव्ह गोष्टी बाजूला सारून पॉझिटिव्हिटी मिळवण्यासाठी मदत करतात. ( फोटो क्रेडीट-PTI )

हसणं, आनंदी राहणं हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. सुखी जीवनासाठी आनंदी राहणं हा मंत्रच आहे. अनेकदा एक छोटासा विनोदही दिलखुलास हसण्यासाठी पुरेसा असतो. कोणतंही दु:ख असो किंवा संकट…हसणं हे त्यावरील उत्तम औषध किंवा उपाय आहे अस आपण म्हणू शकतो. आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे आज ‘इंटरनॅशनल जोक डे’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय विनोद दिन आहे.  दरवर्षी १ जुलै हा आंतरराष्ट्रीय विनोद दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या विनोदांनी इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्यांसाठी हा दिवस विशेष आहे. या दिवसाचं मुख्य उद्दीष्ट म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तींना हसवणे आणि त्यांच्यासोबत स्वतःही दिलखुलास हसणे.

आंतरराष्ट्रीय विनोद दिनाचा इतिहास

आंतरराष्ट्रीय विनोद दिनाची सुरवात ९० दशकाच्या मध्यभागी झाली होती. काही रिपोर्टनुसार, अमेरिकन लेखक वेन रेनाझल यांनी १९९४ रोजी या दिवसाचा विचार केला होता. त्यांनी आपल्या पुस्तकांच्या प्रमोशनसाठी हा दिवस तयार केला. व्हॉट नॅशनलडेने दिलेल्या वृत्तानुसार, रेनाझल यांनी सांगितलं की, “मी १ जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय विनोद दिन म्हणून सुरु केला. कारण वर्ष अधिकृतपणे अर्धे संपले होते, आणि तेव्हाच मी माझ्या पुस्तकाची जाहिरात करायला सुरवात करणार होतो.  म्हणून मी त्या दिवसाचा वापर माझ्या विनोदी पुस्तकांच्या जाहिरातीसाठी केला.”

आंतरराष्ट्रीय विनोद दिनाचे महत्व

विनोदाच्या माध्यमातून आनंद देण्याच्या दृष्टीने विनोद दिन साजरा केला जातो. हास्य आपल्याला आपल्या आयुष्यात बर्‍याच प्रकारे मदत करते. हसण्यामुळे रक्तभिसरणास मदत मिळते असं डॉक्टरही सांगतात. तर फुफ्फुस आणि स्नायूंसाठीही फायदेशीर ठरतं. थोडक्यात आनंदी राहिल्याने शारीरिक प्रतिकारांना सामोरे जाण्यास देखील मदत मिळते.

अनेकदा यामुळे मनातील नकारात्मकता दूर होऊन सकारत्मकता मिळण्यास मदत होते. तसंच विनोदामुळे आपण इतरांशी सहजपणे जोडले जाऊ शकतो. एका छोटासा विनोदही आपल्या मनावरील ताण कमी करु शकतो. याशिवाय मन शांत करत समोरील व्यक्तीला लवकर माफ करण्यासही अनेकदा उपयुक्त ठरतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: International joke day 2021 history significance ttg

ताज्या बातम्या