How to link Aadhaar with voter ID : भारतीय निवडणूक आयोगाने यंदा होणाऱ्या वर्ष २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. मतदान आणि निवडणूक प्रक्रिया ही एकूण सात टप्प्यांमध्ये होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. याची प्रक्रिया येत्या १९ एप्रिलपासून सुरू होईल. मात्र, निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांचे मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटर आयडी हे त्यांच्या आधार कार्डशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदाराने त्याचे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र जोडल्यास, लिंक केल्यास खोट्या किंवा बनावटी मतांची शक्यता कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते. तसेच, मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही घरबसल्या तुमचे वोटर आयडी आणि आधार कार्ड कसे लिंक करू शकता त्याची प्रक्रिया समजून घ्या.

हेही वाचा : मतदार ओळखपत्र नसलं तरी करा मतदान! लोकसभा निवडणुक २०२४ च्या आधी ‘ही’ माहिती वाचाच

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल [ National Voter’s Service Portal (NVSP)] च्या https://www.nvsp.in/. या अधिकृत वेबसाइटवर जावे.
  • तुम्ही याआधी NVSP पोर्टलवर नोंदणी केली नसल्यास, तुमचे एक नवीन अकाउंट तयार करा. मात्र, तुमचे अकाउंट अस्तित्वात असल्यास, क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक (मतदार आयडी क्रमांक) आणि तुमचा आधार क्रमांक यांसारखे तपशील भरण्यास विचारले जाईल. तेव्हा तुमची माहिती अचूक असल्याची खात्री करा.
  • तुमची माहिती भरल्यानंतर, तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल्या मोबाइल क्रमांकावर एक OTP (वन-टाइम पासवर्ड) पाठवला जाईल. तुमची ओळख पटवून देण्यासाठी NVSP पोर्टलवर हा OTP भरा.
  • दिलेल्या ओटीपीची पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे आधार कार्ड तुमच्या मतदार आयडीशी लिंक करण्याची विनंती सबमिट करा.
  • विनंती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज येईल, ज्यामध्ये तुमची विनंती यशस्वीरित्या सबमिट केली गेली आहे असे सांगितले जाईल.
  • त्यानंतर निवडणूक आयोग तुम्ही दिलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करेल. सर्व माहिती योग्य आणि खरी असल्याची ओळख पूर्ण झाल्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केले जाईल.

हेही वाचा : ‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….

तुमचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणे खूप सोपे असून लवकरात लवकर दोन्ही ओळखपत्र एकमेकांशी लिंक करून घ्यावी.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 how to link voter id and aadhaar check tep by step process in marathi dha
First published on: 17-04-2024 at 12:43 IST