LPG gas cylinder accident insurance : एलपीजी गॅस कनेक्शन घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मोफत इन्श्युरन्स (अपघात विमा) मिळतो. यासाठी ग्राहकाला वेगळा अपघात विमा घ्यायची गरज नाही. गॅस कनेक्शन घेताना अपघात विमा तुम्हाला मोफत मिळतो. गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कंपनी प्रत्येक व्यक्तीला सहा लाख रुपये नुकसान भरपाईच्या रुपाने देते. याशिवाय स्फोटामध्ये घर किंवा प्रॉपर्टीच नुकसान झालं असेल तर दोन लाख रुपयापर्यंत नुकासान भरपाई मिळते.

अपघात विम्याची रक्कम देण्यापूर्वी कंपनी स्फोट झालेल्या ठिकाणाची तपासणी करते. स्फोट किंवा अपघात गॅस सिलेंडरमुळेच झाला आहे का? हे या तपासात पाहिलं जातं. तपासादरम्यान कंपनीला जर गॅस सिलिंडरमुळे अपघात झाला असून त्यामध्ये नुकासान झाल्याचं समोर आल्यास योग्य ती नुकासान भरपाई दिली जाते. ग्राहकाला विमा कंपनीमध्ये या अपघातासाठी क्लेम किंवा संपर्क करण्याची गरज नाही.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी काय करावं लागेल?

– सर्वात आधी जवळील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा, एएपआयआर दाखल करा.

– गॅस डिस्ट्रीब्यूटरला एफआयआरची एक प्रत द्या

– गॅस डिस्ट्रीब्यूटर तुमची एफआयआर प्रत तेल कंपनीला पाठवेल.

– विमा कंपनीची एक टीम घटनास्थळावर दाखल होईल आणि तपास करेल.

– तपासानंतर गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेलं नुकसानाची रक्कम ही टीम ठरवेल.

– तेल कंपनी क्लेम केलेली रक्कम वितरकाकडे पाठवले.

– वितरक ही रक्कम ग्राहक किंवा त्याच्या परिवाराला सुपूर्द करेल.

Story img Loader