तुम्ही सुद्धा स्वत:चं नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागांमध्ये एक लाख घरं बांधण्यास मंजूरी देण्यात आलीय. ही घरं आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पुदुचेरीमध्ये बांधण्यात येणार आहेत.

गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील घरांची संख्या, नव्याने घरं उभारणं आणि इतर मुद्द्यांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात चर्चा कली. याच चर्चेदरम्यान त्यांनी एक लाख सात हजार घरं नव्याने बांधण्यास परवानगी दिलीय.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आवास योजना (शहरी भाग) मोहिमेअंतर्गत एकूण १ कोटी १४ लाख घरांच्या बांधणीला परवानगी देण्यात आलीय. त्यापैकी ५३ लाख घरं बांधून पूर्ण झाली असून ती पात्र व्यक्तींच्या ताब्यात देण्यात आलीय. या घरांसंदर्भातील माहिती पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आहे.

नव्याने मंजूरी देण्यात आलेल्या घरांबरोबरच या योजनेअंतर्गत घर मिळवण्यासाठी नोंदणी कशी करावी ते पाहूयात.

> पंतप्रधान आवास योजनेची अधिकृत वेबसाईट म्हणजेच http://pmaymis.gov.in ला भेट द्या.

> या साईटवरील ‘Citizen Assessment’वर क्लिक करुन Apply पर्याय निवडा.

> त्यानंतर समोर अनेक पर्याय दिसतील. त्यानुसार तुमच्या आवश्यकतेनुसार कोणत्या ठिकाणच्या घरासाठी अर्ज करायचाय ते निवडा.

> त्यानंतर अर्जदारांना आधारकार्ड क्रमांक देऊन Check वर क्लिक करावं लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

> त्यानंतर एक ऑनलाइन फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती भरुन घ्यावी.

> त्यानंतर कॅप्चा कोड टाकून, व्हेरिफाय करुन फॉर्म सबमिट करावा.

> फॉर्म सबमीट केल्यानंतर स्क्रीनवर अर्ज क्रमांक दिलेस. त्याचं प्रिंट काढून पुढील अपडेट्साठी ते जपून ठेवावं.