Cheapest Laptop Market: आजच्या या डिजिटल काळात लॅपटॉपचे महत्त्व नाकारता येणार नाही. लॅपटॉपच्या मदतीने ऑफिसच्या कामापासून ते शाळा-कॉलेजपर्यंतचे प्रोजेक्ट तयार करता येतात. पण, अजूनही असे बरेच लोक आहेत जे कमी बजेटमुळे चांगल्या कॉन्फिगरेशनसह लॅपटॉप खरेदी करू शकत नाहीत. पण आता काळजीचे कारण नाही. कारण आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत, ज्या लॅपटॉपची शोरूमची किंमत कमीत कमी ३० ते ४० हजार रुपये असते, तो भारतातील या मार्केटमध्ये तराजूवर तोलून किलोच्या भावात विकला जातो. भारतातील या मार्केटमध्ये तुम्ही नगाने नव्हे, तर चक्क ५००० रुपये किलोप्रमाणे लॅपटॉप खरेदी करू शकता.

परवडणारा लॅपटॉप बाजार

दिल्लीत एक असे मार्केट आहे जेथे महागडे लॅपटॉप किलोच्या भावाने मिळतात. हे भारतच नाही तर आशियातील सर्वात मोठे आणि स्वस्त मार्केट आहे. ज्या लॅपटॉपची शोरूमची किंमत कमीत कमी ३० ते ४० हजार रुपये असते, तो येथे तराजूवर तोलून किलोच्या भावात विकला जातो. या मार्केटमध्ये चांगल्या कंडीशनचा लॅपटॉप फक्त ५ हजार रुपये किलोच्या रेटने खरेदी करता येतो. दिल्लीत हे मार्केट नेहरू प्लेसवर आहे. येथे असे अनेक शॉप आहेत जेथे लॅपटॉप फक्त ७ हजार रुपये वा त्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. या मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही कंपनीचा लॅपटॉप किंवा कोणतेही गॅझेट उपकरण कमी किमतीत मिळेल. यासोबतच लॅपटॉपशी संबंधित अ‍ॅक्सेसरीजही येथे अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. मात्र, या बाजारातून काही खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

(हे ही वाचा: भारतातील ‘या’ ठिकाणी चक्क भारतीयांनाच नो एन्ट्री, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का! )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘या’ गोष्टींची काळजी घ्या

  • बाजारात अनेक दुकाने आहेत जी सेकंड हँड वस्तू विकतात. या प्रकरणात, खरेदी करण्यापूर्वी, इतर दुकानांमध्ये गॅझेटची किंमत शोधा.
  • वस्तू खरेदी करण्यासाठी, तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान आणि गॅजेट्सचे चांगले ज्ञान असलेल्या व्यक्तीला सोबत घ्या, जेणेकरून खराब माल घरी येऊ नये.
  • कोणतेही उपकरण विकत घेण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी करून घ्या.
  • लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी, तो काही काळ चालवा आणि डिव्हाइस व्यवस्थापकाकडे जा आणि त्याचे कॉन्फिगरेशन तपासा.

(वरील गोष्टींची खात्रीपूर्वक तपासणी करुनच लॅपटॉपची खरेदी करा.)