लग्न हा प्रत्येक तरुणीच्या आयुष्यातील सर्वात आनंदा दिवस असतो. प्रत्येक नवरीला आपल्या लग्नात सुंदर दिसायचे असते कारण लग्नामध्ये नवरीचा मेकअप सर्वात जास्त लक्ष वेधून घेतो. सर्वांच्या नजरा फक्त नवरीकडेच असतात. मेकअप केल्याने तुमचा संपूर्ण लूक बदलून जातो. पण जर तुमचा मेकअप खराब झाला तर पूर्ण लूक फिका पडतो. अशा स्थितीमध्ये जर तुम्ही स्वत:साठी योग्य मेकअप निवडला पाहिजे जो तुमची सुंदरता आणखी खुलवेल. त्यामुळे आजकाल नवरीचा HD मेकअप केला जातो. सध्या खूप ट्रेंड होत असलेल्या या मेकअपमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील सर्व डाग लपवले आणि प्रत्येक छोटी गोष्ट लक्षात घेऊन मेकअप केला जातो. एचडी कॅमेऱ्यात फोटो काढले जाणार आहेत हे लक्षात घेऊन हा मेकअप केला जातो. जाणून घ्या एचडी मेकअप म्हणजे काय आणि तो कसा केला जातो.

एचडी मेकअप म्हणजे काय?(What Is HD Makeup)

एचडी मेकअप म्हणजे हाय डेफिनेशन मेकअप लुक, ज्यामध्ये एचडी कॅमेऱ्यात फोटो काढले जाणार आहे हे लक्षात घेऊन मेकअप केला जातो. आजकाल, विवाहसोहळ्यांमध्ये एचडी कॅमेऱ्यांद्वारे फोटोशूट केले जातात जे अगदी लहान गोष्ट देखील कॅप्चर करतात. या मेकअपमुळे चेहऱ्यावर दिसणारे डाग लपलेले जातात. आजकाल बहुतेक सेलिब्रिटी हा मेकअप करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही मेकअप आर्टिस्ट एचडी मेकअपच करतात. हे पूर्णपणे नैसर्गिक, डागविरहित आणि नॉन-केकी (मेकअपचा थर दिसणार नाही असा) लुक देते. एचडी मेकअपमध्ये चेहऱ्यावर लावलेली उत्पादने ब्रशच्या साहाय्याने अशा प्रकारे लावली जातात जे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

हेही वाचा – Google Pay वर व्यवहार करताना चूकनही वापरू नका ‘हे’ ॲप्स; क्षणार्धात तुमचे बँकेचे खाते होऊ शकते रिकामे

एचडी मेकअप उत्पादने काय आहेत?
एचडी मेकअपमध्ये वापरण्यात येणारी उत्पादने उच्च दर्जाची आणि लाईट डिफ्यूझिंग कोटिंग असलेले असतात आहेत. या मेकअपसाठी तुम्हाला अशी उत्पादने निवडावी लागतील जी तुम्हाला मुलायम, पारदर्शक आणि डाग विरहित लुक देईल. मेकअप त्वचेवर अशा प्रकारे लावला केला जातो की तो अजिबात जास्त वाटत नाही. मेकअप केल्यानंतर नैसर्गिक चमक दिसून येते.

हेही वाचा – घरात ‘एअर प्युरिफायर’ बसवलाय? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, घरातील हवा राहिल स्वच्छ आणि शुद्ध

कसा करायचा एचडी मेकअप ?
एचडी मेकअप देखील सामान्य मेकअपप्रमाणेच केला जातो. यात उच्च दर्जाची उत्पादने वापरली जातात जी खूप महाग असतात. ब्रश आणि स्पंजच्या मदतीने मेक-अप चांगले मिसळले जाते. त्याचे मिश्रण सर्वात महत्वाचे आहे जे तुम्हाला एक अतिशय नैसर्गिक असल्याचा अनुभव देते. मेकअपमध्ये प्रीमियम दर्जाची उत्पादने वापरली जातात.