क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘ओपनहायमर’ चित्रपटाची चर्चा जगभरात सुरु आहे. शुक्रवारी २१ जुलैला हा चत्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर एकच धमाका केला. सध्याच्या घडीला या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. ओपनहायमरसोबत आयमॅक्स (IMAX) फॉर्मेटचीही खूप चर्चा होत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाला आयमॅक्स कॅमेरात शूट केला आहे. अशातच प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, आयमॅक्स शूट काय असतं? आणि या फॉर्मेटमध्ये प्रदर्शित केल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये काय फरक असतो? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. ओपनहायमर अमेरिकेतील एक भौतिक शास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपनहायमर यांचं बायोपिक आहे. ओपनहायमर अमेरिकेचे पहिले अणुबॉम्ब निर्माते होते. त्यांच्यावर आधारित क्रिस्टोफर नोलने हा चित्रपट केला आहे.

काय आहे IMAX?

आयमॅक्स कॅमेरातून शूट केलेले चित्रपट आणि सामान्य चित्रपट यांच्यात काय फरक असतो, हे एका उदाहरणाच्या माध्यमातून सांगण खूप सोपं होईल. आयमॅक्स थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला ‘धूम ३ चित्रपट’ यशराज फिल्म्स प्रोडक्शनने बनवला होता आणि हा पहिला चित्रपट होता, जो आयमॅक्स फॉर्मेटमध्ये बनवण्यात आला होता. आयमॅक्समध्ये चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना एक नवीन अनुभव मिळतो. स्क्रीनची मोठी साईज आणि जबरदस्त ऑडिओ सिस्टमने चित्रपट पाहताना प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. पाणी असलेलं दृष्य पाहताना असं वाटतं की, प्रेक्षक स्वत: त्या पाण्यात आहेत.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

नक्की वाचा – भारतात आहे जगातील सर्वात मोठी ‘ऑफिस बिल्डिंग’, ठिकाणाचं नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

‘IMAX’ चा फुल फॉर्म काय आहे?

आयमॅक्स एक अॅडवान्स टेक्नोलॉजी आहे. ज्यामध्ये 70mm पर्यंत रेजोल्यूशन दाखवलं जातं. ही टेक्निक कॅनडाची कंपनी IMAX कॉर्पोरेशनद्वारे विकसित करण्यात आली आहे. १९६७ मध्ये याची स्थापना करण्यात आलीय आणि हा शब्द ‘Image Maximum’ मधून घेण्यात आला आहे.

सामान्य थिएटर आणि IMAX मध्ये काय फरक आहे?

आयमॅक्स थिएटरमध्ये प्रेक्षकांना मोठी स्क्रीन आणि चांगल्या ऑडिओ सिस्टमच्या सुविधेचा लाभ घेता येतो. याचसोबत हायटेक स्पिकर्स लावलेले असतात. ज्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटांच्या जगात असल्यासारखं वाटतं. सामान्य चित्रपटगृहात पिक्चर आणि ऑडिओची गुणवत्ता सामान्य असते. याशिवाय आयमॅक्स थिएटरची स्क्रीन सामान्य थिएटरच्या तुलनेत मोठी असते.

सर्टिफाईड व्हावं लागतं

आयमॅक्स चित्रपट शूट करण्यासाठी फिल्म मेकर्सला पहिल्यांदा सर्टिफाईड व्हावं लागतं. भारतात २३२३ IMAX थिएटर संचालित केलेले असतात. आयमॅक्समध्ये प्रदर्शित करणं आणि या कॅमेरात शूट करण्यात मोठा फरक असतो. आयमॅक्स चित्रपट शूट करण्यासाठी 65mm कॅमेराचा उपयोग केला जातो.