भारतात जवळपास सगळेजण Whatsapp या अॅपशी परिचित आहेत. विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यत सर्वचजण हे अॅप वापरत आहेत. पण बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आपले वैयक्तिक चॅट्स इतर कोणी वाचू नये. म्हणून बऱ्याचदा ते डिलीट केले जातात. पण आता ती वेळ येणार नाही. कारण, Whatsapp चे असे फीचर्स आहेत की, ज्यामुळे तुम्ही तुमचे चॅट्स लपवून ठेवू शकणार आहात. ह्या दोन टिप्स त्यासाठी उपयोगी पडतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Can we hide a chat in Whatsapp:

पहिल्या उपायात तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त तुम्हाला जे चॅट लपवायचं आहे, त्यावर लाँग प्रेस करा. त्यानंतर तुम्हाला वर उजव्या बाजूला तीन ठिपके दिसतील. या तीन ठिपक्यांवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Archieve Chat असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचं निवडलेलं चॅट लपलं जाईल. तुम्हाला जर ते चॅट वाचायचं असेल तर चॅट्समध्ये सगळ्यात शेवटी गेल्यावर Archieve Chats (किती चॅट Archieve केलेत त्यांची संख्या) या पर्यायावर क्लिक केलं तर तुम्हाला हे चॅट वाचता येईल. मात्र, दुसऱ्या व्यक्तीला हे चॅट सहजासहजी दिसणार नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp user hide personal chat and secret conversations 2 tips and tricks vsk
First published on: 19-06-2021 at 21:28 IST