बहुतांश घरात अन्न शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. आता अनेक घरांमध्ये गॅस कनेक्शनही उपलब्ध झाले आहे. ज्यामध्ये गॅस थेट पाईप कनेक्शनद्वारे शेगडीला जोडण्यात येतो. पण ही सुविधा सगळीकडे उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अजुनही बऱ्याच घरात गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. प्रत्येक घरात असणाऱ्या या सिलेंडरबाबत अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गॅस सिलेंडरचा आकार गोल का असतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. इतर कोणत्याही आकरात आपण गॅस सिलेंडर कधी पाहिला नाही, तो नेहमी गोल आकारातच असतो. यामागे काय कारण आहे जाणून घ्या.

आणखी वाचा: अंधारातही डास आपल्याला कसे शोधतात? जाणून घ्या यामागचं कारण

सिलेंडरचा आकार गोल असण्यामागचे कारण
सिलेंडरचा आकार गोल असण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या गॅसवर दबाव निर्माण करणे. गोल आकारामुळे सिलेंडरमधील गॅसवर दबाव टाकणे, तो कंप्रेस करणे सोपे होते. यासह गोल आकारामुळे सिलेंडर सहजरीत्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येते. याच कारणांमुळे सिलेंडरचा आकार गोल असतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why gas cylinder is cylindrical in shape know the reason behind it pns
First published on: 27-12-2022 at 13:47 IST