World Wildlife Day 2023: २०१३ पासून जगभरामध्ये ३ मार्च हा दिवस ‘जागतिक वन्यजीव दिन’ म्हणून साजरा केला जातो. लोकांमध्ये पृथ्वीवरील प्राणी, पक्षी आणि अन्य वन्यजीवांबद्दल जागरुकता वाढावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघाद्वारे हा निर्णय घेण्यात आला होता. वन्यजीव दिनाच्या निमित्ताने शाळा-महाविद्यालयांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लहान मुलांना, तरुणांना वन्यजीवनासंबंधित माहिती दिली जाते. युवा पिढीला संवर्धानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्र संघाने घेतलेल्या या निर्णयाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत.

Convention on International Trade in Endangered Species (CITES) या संयुक्त राष्ट्र संघाच्या संस्थेची सुरुवात ३ मार्च १९७३ रोजी झाली होती. वन्यजीवाचे संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. २०१३ मध्ये या संस्थेच्या बैठक बॅंकॉकमध्ये आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान, १६ मार्च २०१३ रोजी थायलंडने ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव मांडला होता. त्यानंतर २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने याबाबत अधिकृत घोषणा केली होती. CITES ची स्थापना याच दिवशी झाल्यानेही हा दिवस या संस्थेसाठी खास आहे.

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

आणखी वाचा- जगभरात का साजरा केला जातो ‘World Hearing Day’? काय आहे महत्त्व?

२०२३ मध्ये CITES संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने यंदाचा जागतिक वन्यजीव दिन मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करायचा संस्थेचा मानस आहे. ‘वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी’ (Partnerships for wildlife conservation) ही या वर्षाची थीम आहे. ५० व्या वर्धापन दिना निमित्त संस्थेद्वारे जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वाढत्या मानवी लोकसंख्येचा प्रभाव पृथ्वीवरील संसाधनासह वन्यजीवनावर देखील होत आहे. मानवाच्या अतिताईपणामुळे वन्यजीवांचे नुकसान झाले आहे. बरेचसे प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या प्रजातींचे संरक्षण न केल्याने ते लोप पावत गेले आहेत. आत्ताही अनेक प्रजातींचे अस्तित्त्व धोक्यात आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे.