अ‍ॅस्टॉराईड डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन हा दिवस प्रत्येक वर्षी  ३० जून रोजी साजरा केला जातो. डिसेंबर २०१६ मध्ये यूएन जनरल असेंब्लीने म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघाने, ३० जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस म्हणून घोषित केला होता. लघुग्रहांच्या घातक परिणामाबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी आणि या लघुग्रहांच्या भूमिकांबाबत माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा खास दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली होती.

काय आहे आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिनाचा इतिहास?

यूएन जनरल असेंब्लीने डिसेंबर २०१६मध्ये A/RES/71/90 हा ठराव मंजूर केला आणि ३० जून हा आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन म्हणून घोषित केला. ३० जून ही तारीख यासाठी निवडली गेली कारण हा दिवस १९०८ सालच्या तुंगुस्का घटनेच्या वर्षपुर्तीचं प्रतिक आहे. असोसिएशन ऑफ स्पेस एक्सप्लोरर्स आणि पीसफुल युजेस ऑफ आउटर स्पेस (COPUOS) च्या समितीने केलेल्या प्रस्तावाच्या आधारे जनरल असेंब्लीने हा निर्णय घेतला.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर

लघुग्रह म्हणजे काय?

लघुग्रह म्हणजे एक खगोलीय पिंड किंवा खडक असतो जो अंतराळामध्ये अविरत फिरत असतो. हे सूर्याभोवती फिरणारे खडकळ वस्तूप्रमाणे असतात. मंगळ आणि गुरूच्या क्षेत्रादरम्यान लघुग्रह पट्ट्यात ते मोठ्या प्रमाणात अधिक आढळतात. त्यांना सौरमंडळाची उरलेली सामग्री म्हणून देखील ओळखले जाते. म्हणनूच सर्व ग्रहांची निर्मिती झाल्यानंतर या लघुग्रहांचा एक पट्टा मंगळ व गुरूच्या कक्षांदरम्यान निर्माण झाल्याचं काही शास्त्रज्ञ मानतात. लघुग्रहांच आकार गारगोटीच्या आकारापासून ते सुमारे ६०० मैलांपर्यंत आहे. सौर मंडळामध्ये असंख्य लघुग्रह अस्तित्त्वात आहेत. हे सर्वच सूर्यमालेच्या जन्माच्या वेळी विकसित झाले नव्हते. जेव्हा कुठलाही लघुग्रह सूर्याला प्रदक्षिणा पूर्ण करुन पृथ्वीवर पडतो, तेव्हा त्याला उल्का म्हणतात. याला सर्वसाधारणपणे तुटलेला तारासुद्धा म्हटलं जातं.

काय आहे तुंगुस्काची घटना आणि तिचा प्रभाव?

३० जून रोजी, रशियातील सायबेरियातील पॉडकामेंनाय तुंगुस्का नदीवर मोठा स्फोट झाला. नासाच्या मते तेव्हा प्रति तास सुमारे ३३,५०० मैल वेगाने लघुग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला होता. २२० दशलक्ष पौंड वजन असणाऱ्या या लघुग्रहामुळे हवा सुमारे ४४,५०० अंश फॅरेनहाइट एवढी गरम झाली. सुमारे २८,०००  फूट उंचीवर, दाब आणि उष्माच्या संयोजनामुळे लघुग्रहाचा आकार कमी झाला आणि तो स्वतःच नष्ट झाला. परिणामी फायरबॉल तयार झाले आणि सुमारे १८५ हिरोशिमा बॉम्बएवढी ऊर्जा यामधून निर्माण झाली. यामध्ये ८३० स्वेअर मैल (२१५० स्वेअर किलोमीटर) क्षेत्राच्या स्फोटात अंदाजे ८० दशलक्ष झाडं नष्ट झाली.