जागतिक युवा कौशल्य दिवस तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित व इतर कौशल्यांच्या विकासाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना रोजगार, योग्य काम आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करणे गरजेचे आहे. हा दिवस वर्तमान आणि भविष्यातील जागतिक आव्हाने सोडविण्यासाठी कुशल तरुणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर देखील प्रकाश टाकतो. हा दिवस तरूणामधील संवाद, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, कंपन्या, नियोक्ते इत्यादींसाठी एक खास संधी प्रदान करतो. भारतातील स्किल इंडिया मिशन देखील या दिवशी सुरू करण्यात आले आहे. स्किल इंडिया हा केंद्र सरकारचा एक पुढाकार आहे जो युवा कौशल्याचे सबलीकरण करण्यासाठी आणि त्यांना अधिक रोजगारक्षम बनवण्यासाठी सुरू केलेला आहे.

युनेस्कोचे सर्वेक्षण

संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) यांनी जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार जगातील ७०% विद्यार्थी लॉकडाउनमुळे वाईट रीतीने प्रभावित झाले आहेत. अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण सुरु असल्यामुळे साधना अभावी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. कोविड -१९ या  साथीच्या आजारामुळे सध्या ६ पैकी १ हून अधिक तरुण कामावर जात नाहीत. अशा वेळी जेव्हा तरुणांना रिकव्हरीच्या प्रयत्नास हातभार लावण्याचे आवाहन केले जाते, तेव्हा त्यांना पुढे असलेल्या आव्हांनाना यशस्वीरित्या बाजूला करण्यासाठी त्यांच्या कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे.

SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

जागतिक युवा कौशल्य दिवस २०२१ थीम

यंदाच्या जागतिक युवा कौशल्य दिवसाची ‘Reimagining Youth Skills Post Pandemic’ अशी थीम आहे. महामारी नंतर युवा कौशल्यावर नवीन विचार करणे गरजेचे आहे.

जागतिक युवा कौशल्य दिनाचा इतिहास

डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने ठराव स्वीकारून १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या तरूणांसाठी बेरोजगारी आणि रोजगाराच्या आव्हानांच्या बाबतीत अधिक चांगली सामाजिक-आर्थिक परिस्थिती प्राप्त करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

महत्त्व

२१ व्या शतकातील तरुणांसाठी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. युवा २०२० च्या ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड्सच्या अहवालानुसार २०२० पासून तरुण  नोकरी नसलेले किंवा प्रशिक्षित नसलेल्या लोकांची आकडेवारी वाढली आहे.