जीन्स पॅन्ट आवडत नाही असे म्हणणारे आज फार कमी सापडतील. त्यामुळे जगभरात जीन्सची एक प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. सर्व वयोगटातील लोकांमध्ये लोकप्रिय असणारी ही जीन्स तरुणांसाठी मात्र एक जिव्हाळ्याचा विषय असते. यात भारतात जीन्स पॅन्ट घालणे म्हणजे फार मॉडर्न असल्याचा समज आहे. त्यामुळे टॉप ब्रँडची जीन्स वापरण्याकडे भारतीयांचा कल वाढतोय, पण केवळ भारतातचं नाही तर आता जगभरातील फॅशन जगतात जीन्सने एक वेगळे महत्व प्राप्त केले आहे. या जीन्सच्या दुनियेतील तुम्ही लेव्हीस (Levis) हे नाव ऐकलचं असेल. अनेकांनी तर या ब्रँडची जीन्स घातली पण असेल. पण तुम्हाला माहित आहे का की, लेव्हीस जीन्स कंपनीने जगात सर्वप्रथम ब्लू जीन्स बनवली आहे.

या ब्लू जीन्सने गेल्या अनेक दशकांपासून जागतिक बाजारपेठेवर राज्य केले आहे. यानंतर सर्व वर्गातील लोकांमध्ये ही जीन्स लोकप्रिय झाली. भारतासारख्या देशात एक आरामदायी पोशाख म्हणून ब्लू जीन्सला खूप पसंती दिली जाते. शहरांपासून ते अगदी खेड्यांपर्यंत ही जीन्स फेमस झाली.

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
d subbarao rbi former governor
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊनही भारत गरीबच राहणार – RBI चे माजी गव्हर्नर
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

लेव्हीस हा जगातील सर्वात लोकप्रिय अमेरिकन कपड्यांचा ब्रँड आहे. या कंपनीचा व्यवसाय ६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. जगातील सर्वात पहिली ब्लू जीन्स निर्मितीचे श्रेय हे याच कंपनीला जाते. या कंपनीचे पूर्ण नाव लेव्हीस स्ट्रॉसस अँड कंपनी (Levi Strauss & Co.) असे आहे, जे आता Levis या नावाने ओळखले जाते. कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉसस हे जर्मनीचे रहिवासी होते. त्यांनी १८५३ मध्ये कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को येथे या कंपनीची सुरुवात केली.

कंपनीची सुरुवात नेमकी कशी झाली?

लेव्हीस कंपनीचे संस्थापक लेव्हीस यांचा जन्म २६ फेब्रुवारी १८२९ रोजी जर्मनीमध्ये झाला. यानंतर १८४७ मध्ये ते आपल्या आईसोबत अमेरिकेत गेले. जिथे त्यांचा भाऊ आधीपासून राहत होता. यादरम्यान लेव्हीच्या भावाचा न्यूयॉर्क शहरात एक चांगला व्यवसाय होता. यावेळी लेव्ही देखील आपल्या भावाला त्याच्या व्यवसायात मदत करत होता, त्यानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरु केला.

लेवीने प्रथम स्वत:च्या नावाने एक होलसेल व्यवसाय सुरू केला. भावाच्या दुकानातून कच्चा माल आणून तो नवीन ग्राहकांना विकायचे. या वस्तूंमध्ये विविध प्रकारचे कपडे आणि घर सजावटीच्या वस्तूंचा समावेश होता. यावेळी लेवीने आधी तंबू आणि नंतर ब्लू जीन्स बनवण्याची योजना आखली.

लेवीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट

एके दिवशी लेवीच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट आला जेव्हा त्याला एका नव्या व्यवसायाची माहिती मिळाली. लेवीला कळले की, त्याचा एक ग्राहक जेकब डब्लू डेव्हिस हा डेनिम पँट बनवतो. यावेळी लेवीने आणि जेकबने मिळून एक नवीन उत्पादन तयार केले, ज्याचे नाव होते, ब्लू डेनिम जीन्स.

लेव्हीस ब्राँड कसा प्रसिद्ध झाला?

१९२० मध्ये ब्लू जीन्स खूप लोकप्रिय झाली. पुरुषांबरोबरच स्त्रियाही ती घालू लागल्या. संपूर्ण अमेरिकेत ब्लू जीन्सची एक क्रेझ पाहायला मिळाली. परिधान करण्यासाठी अनेकांना ती खूप आरामदायक वाटू लागली. विशेष म्हणजे ही जीन्स बरेच दिवस घालता येते, त्यामुळे लोकांना ती खूप सोयीची वाटू लागली. सुरुवातीला लेव्ही ब्लू जीन्सचे ग्राहक खाण कामगार, पशुपालक आणि कारखान्यात काम करणारे कामगार होते.

पण दुसऱ्या महायुद्धात ही ब्लू जीन्स सर्वाधिक फायदेशीर ठरली. त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही जीन्स अनिवार्य करण्यात आली होती. कारण जीन्स घातल्यानंतर वेगाने आणि सोयीस्कररित्या धावता येत होते. यामुळे १९५० आणि १९८० या काळात ब्लू जीन्स हा तरुणाईचा एक आवडता पोशाख बनला होता. तेव्हापासून लेव्हीस हा ब्रँड प्रसिद्धीच्या झोतात आला.

पण हा ब्रँड जगभरात पोहण्यासाठी २०१९ हे वर्ष उजाडले. अमेरिका, ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर लेव्हीस ब्रँडचे कपडे जगातील अनेक विकसनशील देशांच्या बाजारपेठेतही पोहोचले. उदाहरणार्थ, भारत, श्रीलंका, व्हिएतनाम आणि इंडोनेशियामध्ये लेव्हीस ब्रँडचे कपडे स्वस्त आणि उपयुक्त असल्यामुळे लोकप्रिय झाले आणि खेडेगावांपर्यंत पोहचले. २०२२ मध्ये लेव्हीस कंपनीची उलाढाल ही 6.169 अब्ज डॉलरवर पोहचली आहे.