ड्रायिव्हग हा अनेकांच्या आवडीचा विषय. स्वतची कार घेऊन लाँग ड्राइव्हला जाण्याचा आनंद तर विरळाच. कार चालवताना अनेक व्यवधाने पाळावी लागतात. या व्यवधानांमध्येच कारच्या महत्त्वाच्या भागांची किमान जुजबी ओळख असण्याचाही समावेश आहे. काहींना ही ओळख असते तर काहीजण अनुभवातून शिकतात. चालत्या गाडीने रस्त्यात अचानक असहकार पुकारला की मग याचे महत्त्व पटते. गाडीच्या महत्त्वाच्या भागांची माहिती या सदरातून ओळख करून देणारा हा कारनामा.
बऱ्याचदा आपण गाडीच्या मागे सुविचार लिहिलेला वाचतो, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक वगरे..मथितार्थ काय तर कोणत्याही गोष्टीला कुठेतरी गतिरोध हा हवाच असतो. आपल्या कारनाम्याचा आज हाच विषय आहे.. गाडीचा ब्रेक. गाडीचं नियंत्रण हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. गाडीच्या एबीसीमधला एक महत्त्वाचा घटक (अ‍ॅक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच म्हणजेच एबीसी). अ‍ॅक्सिलेटर आणि क्लच यांच्यामधोमध ब्रेक असतो. सध्याच्या काळात मेकॅनिकल आणि हायड्रॉलिक असे दोन प्रकारचे ब्रेक गाडीत असतात. तर डिस्क ब्रेक हा उच्चप्रतीच्या कार्यासाठी वापरला जातो. एक धातूची डिस्क चाकासोबत फिरत असते. या फिरणाऱ्या डिस्कवर दोन्ही बाजूंनी मोठा दाब देता येईल असे दोन ब्रेक लायनर दिलेले असतात. जेव्हा ब्रेक दाबला जातो तेव्हा डिस्कवर दोन्ही बाजूंनी मोठा दाब निर्माण होतो व चाक थांबते. इंटरनल एक्स्पांिडग ब्रेकही गाडीत वापरले जातात. यात चाकांच्या आतील बाजूकडून आवळून गती रोखणाऱ्या ब्रेकला ’आतून उघडणारे ब्रेक’ असे म्हणतात. या ब्रेकमध्ये अ‍ॅसबेसटॉसचे रबर लायनर वापरतात. ज्याचे ड्रम सोबत घर्षण होऊन ब्रेक लागतो. पण त्याचबरोबर घर्षणामुळे आणि तिथेच निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे लायनारची झीज होते. म्हणून विशिष्ट काळानंतर ते बदलणे चांगले ठरते. कधीकधी ब्रेक ऑइल जुने झाले तर ते बदलून नवीन चांगल्या प्रतीचे ऑइल भरावे. अशा प्रकारे काळजी घेतल्याने ब्रेक व इतर भागांचे आयुष्य आणि कार्यक्षमता वाढते.