डिझेलवर चालणाऱ्या आणि जास्त मायलेज देऊ शकणाऱ्या अनेक गाडय़ा
आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील सर्वोच्च दहा गाडय़ांची ओळख..

होंडा अमेझ
प्रतिलिटर २५ किमी असा मोठा गाजावाजा करत अमेझचे गेल्या वर्षी लाँचिंग झाले. आणि काही प्रमाणात ते खरेही आहे. मात्र, २५ नाही पण हायवेवर २५ किमीचा अ‍ॅव्हरेज देते अमेझ. शहरात हा अ‍ॅव्हरेज १६ किमीपर्यंत आहे. त्यामुळे आजही अमेझ ही सर्वात इंधनस्न्ोही आणि जास्त मायलेज देणारी कार समजली जाते.
किंमत : सहा ते साडेसात लाख

टाटा इंडिका
इंडिका आता रस्त्यावर येऊन जुनी झाली मात्र तिची क्रेझ कायम आहे. हायवेवर ही गाडी १९ किमीचा मायलेज देते तर शहरात हाच मायलेज १५ किमी आहे. मात्र, तरीही टाटांच्या या गाडीला आजही मागणी आहे.
किंमत – साडेचार ते पाच लाख

शेवरोले बीट
सर्वात कॉम्पॅक्ट कार म्हणून बीटची नोंद केली जाते. बीटचा कंपनी एॅव्हरेज २५ किमी प्रतिलिटर आहे. मात्र, शहरात या गाडीचा एॅव्हरेज १६ किमी तर हायवेवर १९ किमी आहे. गाडीच्या इंजिनाची क्षमताही ९३६ सीसी आहे.
किंमत : साडेपाच ते सहा लाख

हुंदाई एॅक्सेंट
मारुती डिझायर आणि होंडाच्या अमेझ यांना टक्कर देण्यासाठी ुंदाईने एॅक्सेंट ही सेडान प्रकारातील गाडी बाजारात आणली. ुंदाई एॅक्सेंट शहरात १६ किमी प्रतिलिटर मायलेज देते तर हायवेवर हाच मायलेज २० किमी आहे.
किंमत : साडेपाच ते सात लाख

मारुती स्विफ्ट
स्विफ्ट डिझायरच्या आधीचे हे मॉडेल. इंधनस्न्ोही आणि किफायतशीर डिझेल कार अशी हिची लोकप्रियता आहे. भरवशाची हॅचबॅक अशी तिची ओळख आजही कायम आहे. मायलेज, शहरात साडेचौदा तर हायवेवर १९ किमी आहे.
किंमत : साडेपाच ते साडेसहा लाख

मारुती स्विफ्ट डिझायर
सर्वात विकली जाणारी आणि सर्वात लोकप्रिय अशी डिझायरची ओळख आहे. अर्थात याचे क्रेडिट मारुतीला जाते. असे असले तरी कंपनीचा प्रतिलिटर २४ किमीचा दावा मात्र काही तितकासा खरा वाटत नाही. शहरात डिझायरचा एॅव्हरेज १४ किमी तर हायवेवर १९ किमी आहे.
किंमत : पावणेसहा ते सव्वासात लाख

रिट्झ
डिझायर आणि स्विफ्टनंतर रिट्झला ग्राहकांची जास्त पसंती आहे. रस्त्यावर फारशी दिसत नसली तरी बाजारात रिट्झला चांगली मागणी आहे. हिचा शहरातला मायलेज प्रतिलिटरला १४ किमी तर हायवेवर १९ किमी आहे.
किंमत झ्र् सव्वापाच ते सव्वासहा लाख

निस्सान मायक्रा
आतमध्ये ऐसपस जागा, दिसायला चांगली अशी ही गाडी दुर्लक्षितच राहिली. मात्र, ज्यांनी ही घेतली त्यांच्यासाठी मायक्रा सरप्राइज पॅकेजच ठरली. चांगला मायलेज देणारी ही इंधनस्न्ोही गाडी आहे. हायवेला हिचा एॅव्हरेज साडेएकोणीस किमी प्रतिलिटर आहे तर शहरात हाच मायलेज साडेचौदा किमी आहे. चांगली गाडी आहे.
किंमत : पावणेसहा ते सात लाख

टाटा इंडिगो ईसीएस
कॉम्पॅक्ट सेडान प्रकारातील गाड्यांची आद्यगुरू असलेली गाडी म्हणजे टाटांची इंडिगो ईसीएस. इंधनस्न्ोही गाडी म्हणून हिचा मानमरातब आहे. हिच्या १४०० सीसीच्या इंजिनामुळे ईसीएसचा मायलेज हायवेला साडेएकोणीस किमी तर शहरात १५ किमी आहे.
किंमत : साडेपाच ते सहा लाख