विविध ऑटो शोजमध्ये कन्सेप्ट कार्सचे स्टॉल्स लावले जातात. त्यातील बहुतांश गाडय़ा इलेक्ट्रिकवर चालणाऱ्याच असतात. इंधनाच्या दरांतील भरमसाठ वाढीचा वेग पाहता बहुधा आगामी काळात इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाडय़ांचीच संख्या अधिक असेल. कन्सेप्ट कार्स हे त्यासाठीचे उत्तर नसले तरी भविष्यात अशाही कार्सची निर्मिती होऊ शकत असल्याचेच वाहननिर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सध्या तरी कन्सेप्ट कार्सची चलती आहे असे म्हणायला वाव आहे.
आय-रोड ईव्ही कन्सेप्ट
नवीन, कलात्मक, सर्जनशील अशा नवनीताचे कायमच स्वागत होत असते. प्रत्येक क्षेत्रात काही ना काही तरी सर्जनात्मक घडत असते. वाहननिर्मिती क्षेत्रही त्याला अपवाद नाही. महिन्यागणिक बाजारात लाँच होत असलेल्या गाडय़ांकडे पाहिल्यावर ही बाब लक्षात येते. गाडीची बा’ारचना, अंतर्गत रचना, इंजिन, हेडलाइट्स वगरेत अनेक बदल करून तिची विविध व्हेरिएंट्स बाजारात दाखल होत असतात. या सर्वाचे श्रेय अर्थातच कार डिझायनर्सना जाते. आताशा कन्सेप्ट कारचा ट्रेण्ड येऊ घातलाय. म्हणजे एकदम हटके आकार असलेल्या कार्सची निर्मिती केली जाते. जगभरात होणाऱ्या ऑटो शोजमध्ये ती प्रदर्शनात मांडली जाते. तेथे ती सर्वाचा आकर्षणिबदू ठरते. टोयोटाच्या अशाच एका कन्सेप्ट कारने जीनिवातील ऑटो शोमध्ये सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. आय-रोड ईव्ही कन्सेप्ट असे तिचे नाव..