News Flash

इलेक्ट्रिक कारचा पर्याय

इंधनाचे दर सातत्याने उतरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील या घसरणीमुळे देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ लागले आहे. मात्र, ही परिस्थिती फार काळ टिकेल असे नाही. इंधनाचे दर

| January 30, 2015 02:01 am

इंधनाचे दर सातत्याने उतरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील या घसरणीमुळे देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ लागले आहे. मात्र, ही परिस्थिती फार काळ टिकेल असे नाही. इंधनाचे दर केव्हाही उसळी घेऊ शकतात आणि पुन्हा महागाईचा भडका उडू शकतो. नाही तरी इंधनाचे स्रोत दिवसेंदिवस कमी कमी होत चालल्याची ओरड अधूनमधून होतच असते. या पाश्र्वभूमीवर पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाडय़ा किती दिवस पुरतील याचीही चर्चा होत असते आणि त्यातून मग इलेक्ट्रिकवर, सौरऊर्जेवर वगरे चालणाऱ्या गाडय़ांचा पर्याय समोर ठेवला जातो. या प्रकारच्या गाडय़ांचाही आता ग्राहक गांभीर्याने विचार करू लागला आहे..

इंधन तेल किमती फार काळ कमी राहणार नाहीत आणि आपला देश इंधन आयात करीत असल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर पुन्हा ताण पडेल आणि विकासाची गाडी पुन्हा घसरण्याची शक्यता निर्माण होईल. या पाश्र्वभूमीवर आपण पर्यायी इंधनावर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊ या. विजेवर चालणाऱ्या गाडय़ांचा इतिहास तसा १३० वर्षे जुना आहे. पहिली इलेक्ट्रिक कार १८८४ साली थॉमस पार्कर याने बनवली. प्रथम थॉमस पार्कर याने रिचार्जेबल बॅटरीचे संशोधन करून पहिली इलेक्ट्रिक कार रस्त्यावर आणली. शिकण्यासाठी सोप्या आणि आरामदायक असल्यामुळे १९२० पर्यंत इलेक्ट्रिक कार प्रचलित व लोकप्रिय होत्या. नंतर स्वस्त इंधन तेलनिर्मिती आणि नवीन तंत्रज्ञानामुळे इंधन कारची निर्मिती वाढली. इलेक्ट्रिक बॅटरीने इंधन कार चालू करता येते याचा शोध लागला आणि फोर्ड कंपनीने १९१४ सालापासून असेम्ब्ली लाईन तत्त्वावर प्रचंड उत्पादन सुरू केल्यामुळे इंधन कारच्या किमती अध्र्यापेक्षा कमी झाल्या. जगात अनेक ठिकाणी तेलसाठा सापडला तसेच इंधन भरण्यासाठी कमी वेळ लागतो अशा सर्व कारणांचा एकत्रित परिणाम इलेक्ट्रिक कार उत्पादनावर होऊन इलेक्ट्रिक कारची निर्मिती मागे पडली.

भारतात सौरऊर्जा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे काही ठिकाणी सौरऊर्जा गाडी चार्ज करण्यासाठी वापरली जाते. या विषयात अजून संशोधन झाल्यास आपल्या देशात इलेक्ट्रिक कार हा छान पर्याय होऊ शकतो. आपला देश अजूनही विजेच्या बाबतीत स्वावलंबी नाही. मागणी आणि पुरवठा यांचे गणित जुळत नाही. व्यावसायिक वीजही दिवसा महाग आणि रात्री स्वस्त दरात उपलब्ध असते. त्याचा फायदा करून रात्री कार रिचार्ज केली तर इलेक्ट्रिक कारचा पर्याय म्हणून नक्कीच विचार होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषण तर कमी होईलच आणि देशाच्या अर्थव्यवस्था आणि परकीय चलनाची गंगाजळी यांच्यावरील ताणही कमी होईल.

इलेक्ट्रिक कार म्हणजे काय?
* इलेक्ट्रिक कारचे वजन इतर कारपेक्षा थोडे कमी असते. सोपे उदाहरण द्यायचे झाले तर इलेक्ट्रिक कारही खेळण्यातल्या कारशी साधम्र्य दाखवते. ही कार बॅटरीवर चालते.
* या कारमध्ये इंजिनऐवजी इलेक्ट्रिक मोटार असते. इलेक्ट्रिक मोटार ही इलेक्ट्रॉनिक सíकटमुळे (controller) नियंत्रित होत असल्यामुळे या गाडीत गिअर नसतो. सर्वसाधारण कारपेक्षा इलेक्ट्रिक कारमध्ये गतिवर्धन (acceleration) सफाईदार असते.
* इलेक्ट्रिक कार सफाईदार ब्रेकिंग देतात. त्यामुळे शहरातही गाडी चालवणे फार आरामदायी असते.
* वळण घेताना या गाडय़ा कमी जागेत वळत असल्यामुळे शहर वाहतुकीसाठी उत्तम ठरतात.
* इतर कारमध्ये ब्रेक लावल्यास इंधन वाया जाते. या कारचे वैशिष्टय़ म्हणजे ब्रेक लावल्यास एनर्जी बॅटरीत पुन्हा जमा होते.

फायदे काय?
 * या गाडीमुळे हवेचे प्रदूषण होत नाही.
 * या गाडीत इंजिनाऐवजी मोटार असल्यामुळे गाडी चालू असताना आवाजही फार कमी येतो.
 * बॅटरी काही वर्षांनंतर बदलावी लागते.
 * सर्वसाधारण कारवर होणाऱ्या एकूण देखभाल खर्चापेक्षा हा खर्च कमी असतो.
  *  पेट्रोल आणि डिझेल गाडय़ांपेक्षा जास्त मायलेज देते.
 *  साधारणपणे २ ते २.५ रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो.
तोटे काय..
* बॅटरीच्या किमती जास्त असल्यामुळे या गाडीच्या किमती अनेक करसवलती असूनसुद्धा थोडय़ा महाग आहेत.
* उत्पादन वाढल्यानंतर बॅटरीच्या किमती कमी होऊन या कार अजून कमी किमतीत उपलब्ध होतील.
* सध्या एक गाडी रिचार्ज करण्यासाठी ४ ते ८ तास एवढा कालावधी लागतो.या गोष्टीमुळे अजून या गाडय़ा जास्त लोकप्रिय नाहीत. इलेक्ट्रिक कार चाìजगचा वेळ कसा कमी करता येईल, या विषयावर अजून संशोधन चालू आहे. भारतात महेंद्रा रेवा ही कंपनी इलेक्ट्रिक कार बनवते.

-अमोल चरेगांवकर -amol.charegaonkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2015 2:01 am

Web Title: electric car options
टॅग : Car
Next Stories
1 उतारावरून गाडी सुसाट..
2 लर्निंग लायसन्स
3 ऑटो न्यूज.. : मारुती अल्टो, जगात एक नंबर!
Just Now!
X