माझ्या सुदैवाने मी १८ वर्षांचा झाल्यावर काही दिवसातच बाबांनी गाडी घेतली. आमची पहिली गाडी; मारुती ८००. मला सांगताना आणि समोरच्याला ऐकताना आश्चर्य वाटतं, की मी आजवर बाईक चालवलेली नाही. पण गाडी झोपेतही चालवू शकेन कदाचित इतका हात बसलेला आहे. कारण लायसन्स मिळण्याचं वय झाल्यापासून गाडीच चालवत आलोय. ८०० या गाडीवर प्रचंड जीव होता; अजूनही आहे. yy04सर्वप्रथम जेव्हा ती गाडी घेऊन ६०० किमी लांब शेगावला गेलो तेव्हाचा आम्हाला सगळ्यांना झालेला आनंद विसरता येणार नाही. आमच्या ८०० च्या साक्षीने मी, आम्ही अनेक मौल्यवान क्षण बघितले आहेत त्यामुळे ती गाडी खूप स्पेशल होती. न चुकता पहिल्या स्टार्टरला सुरू होणा-या आमच्या ८०० ला मी डाìलग म्हणायचो. एकदा काही कारणास्तव त्या गाडीतून आम्ही ९ जणांनी प्रवास केलेला आहे, आणि तोही कसारा घाटात. तेव्हा तिच्या रिलाएबिलिटीची प्रचीती आली. ती गाडीच वेगळी होती जिची तुलना कुठल्याही गाडीशी होऊ शकत नाही. भविष्यात मी कुठलीही गाडी घेतली, तरीही माझी डाìलग आमची ८०० च राहील. सदैव. माझी ’कार’कीर्द ८०० पासून सुरू झाली. आज ड्रायिव्हगचं मला जे वेड आहे त्याची जननी म्हणजे आमची ८००. हो पण वेड या निमित्ताने सांगावंसं वाटतं, की विनाकारण रॅश गाडी चालवण्यात मी कधीच भूषण मानलेलं नाही. गाडी अशी चालवावी की मागे बसलेली व्यक्ती शांतपणे झोपू शकेल, असं माझं मत आहे. त्यामुळे गाडी सेफ चालवतो, आणि त्यातच मला मजा येते. ‘कार’कीर्दीत पुढे मुंबईपासून लडाखला जायची इच्छा आहे. आणि शक्य होईल तेव्हा माझी ड्रीम कार टाटा सिएरा घेण्याची मनीषा आहे. ड्राईव्ह सेफ अँड एन्जॉय.