* माझे बजेट चार ते पाच लाख आहे. डॅटसन गो गाडी चांगली आहे का? त्याबद्दल माहिती द्या.
– सचिन येगिनवार
* होय, डॅटसन गो ही चांगली कार आहे. गो प्लस ही गाडीही तुम्हाला घेता येईल. ऑटो गीअर गाडी हवी असल्यास अल्टो के१० किंवा सेलेरिओ बघावी.
* मी पुण्यात नवीन आहे आणि मला दररोज ऑफिसला जाण्यासाठी कार घ्यायची आहे. मी महिन्यातून एकदा नाशिकला जात असते. मी अल्टो के१० किंवा अल्टो८०० चा विचार करत आहे. माझे बजेट चार लाख रुपये आहे. मी कोणती कार घेऊ? ऑटो गीअर चांगली की मॅन्युअल, हेही सांगा.
– यशश्री
* अल्टो के१० ऑटो गीअर ही खूप चांगली कार आहे. ती तुम्ही घ्या. तिचे इंजिन खूप पॉवरफुल आहे आणि मायलेजही २० किमी प्रतिलिटर एवढे आहे. ऑटो गीअरमध्येही ही गाडी उत्कृष्ट स्वरूपाची आहे. हिलाच प्राधान्य द्या.
* मला पेट्रोल आणि सीएनजीवर चालणारी कार घ्यायची आहे. गाडी सिटी ड्राइव्ह तसेच लाँग ड्राइव्हसाठी योग्य असावी व तिचे फीचर्सही चांगले असावेत, अशी माझी अपेक्षा आहे. तसेच मला दोन्ही इंधनांवर गाडीने चांगला मायलेज द्यावा, ही इच्छा आहे. माझे बजेट चार लाखांच्या आसपास आहे. कृपया माझ्यासाठी योग्य गाडी सुचवा.
– तुषार उपाध्ये
* तुषारजी, तुम्हाला सीएनजीवर चालणाऱ्या गाडीत सर्व सेफ्टी फीचर्स मिळणार नाहीत. तसेच चार लाखांत तुम्ही अल्टो ८०० सीएनजी ही गाडी घेऊ शकता. हिचा मायलेज २६ किग्रॅ प्रति किमी आहे आणि मेन्टेनन्सही कमी आहे.
* मी व्यवसायाने डॉक्टर असून माझे रोजचे ड्रायिव्हग किमान ८० किमी आहे. मी ज्या परिसरात फिरतो त्या ठिकाणचे रस्ते फारच वाईट आहेत. मला सुरक्षेच्या दृष्टीने आणि चांगले सस्पेन्शन असलेली व चांगला मायलेज देणारी गाडी घ्यायची आहे. माझे बजेट दहा ते १२ लाख रुपये आहे. मला कृपया सेडान किंवा एसयूव्ही सुचवा.
– डॉ. नीलेश थिटे, सोलापूर
* तुमच्या एकंदर ड्रायिव्हग स्थितीचा विचार करता मी तुम्हाला डिझेलवर चालणारी एसयूव्ही घेण्याचा पर्याय सुचवेन. तुम्ही रेनॉ डस्टर घ्या. मात्र, सेडान प्रकारात स्कोडा रॅपिड डिझेल ही खूप स्टर्डी गाडी आहे.
* सर, मी १५ ऑगस्ट २००८ रोजी वॅगन आर एलएक्सआय डय़ुओ एलपीजी पॅशन रेड ही गाडी घेतली. आमच्या ड्रायव्हरने ही गाडी ३६ हजार किमीपर्यंत चालवली. मात्र, आता मला ही गाडी विकायची आहे. आम्ही रोज ही गाडी बाहेर काढत नाही. आठवडय़ातून एकदाच बाहेर फिरायला म्हणून गाडी काढतो. तेव्हा कृपया आम्हाला हे सुचवा की, ही गाडी विकावी की दुसऱ्या एखाद्या गाडीच्या मोबदल्यात ती एक्स्चेंज करावी?
– टी. एम. बनसोड
* तुम्ही ही गाडी थेट विकू शकता आणि नवीन वॅगन आर किंवा स्विफ्ट घेऊ शकता. या दोन्ही गाडय़ांचा खप प्रचंड असून त्या लोकप्रियही आहेत तसेच त्यांचा मेन्टेनन्सही फारसा नाही.
* कृपया मला मारुतीच्या ईको या एसी मॉडेलचे सकारात्मक आणि नकारात्मक मुद्दे सांगा. तसेच गाडीचा अ‍ॅव्हरेज किती असू शकतो? ही गाडी मी घ्यावी की न घ्यावी हे सांगा. आमचे चौकोनी कुटुंब आहे.
– निकिता फडणीस.
* ईको कारबाबतचे सकारात्मक मुद्दे म्हणजे ही हेवी लोड टेकिंग कार आहे. तिचा लगेज स्पेस प्रशस्त आहे. तिच्यातील आसनांची रचनाही चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिचा ग्राऊंड क्लिअरन्स उत्तम आहे. नकारात्मक मुद्दय़ांचा विचार करता ईकोमध्ये बसणे अवघडल्यासारखे वाटते. हिचा मायलेज १२-१३ किमी प्रतिलिटर एवढाच आहे. हिच्यात कोणतेही सेफ्टी फीचर्स नाहीत, तसेच तिला पॉवर स्टीअिरग नाही आणि पॉवर विण्डोज नाहीत. तुमचे कुटुंब चौकोनी असल्याने तुम्ही वॅगन आर किंवा स्विफ्ट घ्यावी. तुम्हाला चांगली लगेज कॅिरग गाडी हवी असेल, तर ईकोपेक्षा शेवरोले एन्जॉय ही गाडी नक्कीच चांगली आहे.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.
काही अपरिहार्य कारणामुळे आरटीओचे अंतरंग हे सदर प्रसिद्ध होऊ शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Things to know while buying a car
First published on: 17-07-2015 at 01:14 IST