* मला सीएनजी पर्याय असलेली फॅमिली कार घ्यायची आहे. परंतु मी सीएनजी कारमध्ये एलपीजी भरू शकतो का. कृपया सांगा.
– अभिजित
* सीएनजी कारमध्ये तुम्ही एलपीजी भरू शकत नाहीत. तुमच्या जवळपास कुठे सीएनजी असेल तरच तुम्ही सीएनजी कारचा विचार करा. अन्यथा एलपीजी गाडी उत्तम आहे. या गाडीचा मायलेज ४५० किमी प्रतिसिलिंडर असतो. सीएनजी कार फक्त २०० किमीच पळते.
* मी दरवर्षी किमान दोन हजार किमी अंतर कारने फिरते. मी एकतर लाँग ड्राइव्हसाठीच गाडी काढते, अन्यथा मी आठवडय़ातून अर्धा तासच गाडी फिरवते. सध्या माझ्याकडे टाटा व्हिस्टा गाडी आहे. मला मारुती सुझुकी डिझायर गाडी घ्यायची आहे. मात्र, मला सस्पेन्शन चांगले नसल्याचा सल्ला मला देण्यात आला आहे. तुम्ही कोणती गाडी सुचवाल. सुरक्षेच्या दृष्टीने एअरबॅग्ज महत्त्वाच्या आहेतच का.
    – राजश्री आगासकर.
* तुम्हाला चांगल्या मायलेजची ऑटो गीअर गाडी घ्यायची असेल तर सेलेरिओ हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला मायलेजविषयी काही अडचण नसेल तर सिआझ हाही सर्वोत्तम पर्याय आहे. १३ किमी प्रतिलिटर मायलेजची टाटा झेस्ट एक्सएमटी हाही पर्याय चांगला आहे. एबीएस महत्त्वाचे आहे. तसेच एअरबॅग्जही महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला दोन्ही हवे असेल तर झेस्ट एक्सएम (टॉप मॉडेल) हा पर्याय सर्वोत्तम आहे.
* मला लाँग टूरला जाण्यासाठी कोणती गाडी योग्य ठरेल. आणि जास्त जण कोणत्या गाडीत बसू शकतील.
    – जयेश वानखेडे
* तुम्ही तुमचे बजेट सांगितले असते तर बरे झाले असते. लाँग टूरला जाण्यासाठी कमीतकमी बजेटमध्य्ये सहा ते सात लाखांची बोलेरो, नऊ लाखांत तवेरा किंवा झायलो, १२ ते १४ लाखांत इनोवा किंवा एक्सयूव्ही ५०० या गाडय़ा उपलब्ध आहेत.
* गेल्या नऊ वर्षांपासून मी मारुती एस्टीम कार चालवतो आहे. मला आता ही कार विकून नवीन गाडी घ्यायची आहे. माझे बजेट सहा ते सात लाख रुपये आहे. मी सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन एका खासगी कंपनीत सल्लागार आहे. माझे आठवडय़ाला रनिंग सुमारे १०० किमी आहे. कृपया गाडी सुचवा.
    – अशोक गडकरी
* होंडा अमेझ ही चांगली कार आहे. मात्र, वजनाने हलकी असल्याने त्यात जास्त आरामदायी वाटत नाही. तिच्यापेक्षा जास्त टिकाऊ होंडा सिटी आहे. ही गाडी १५ वर्षे चालू शकते. पण तिची किंमत दहा लाख रुपये आहे. जास्तीत जास्त टिकणारी स्कोडा फाबिया ही गाडी तुम्ही घ्या. अन्यथा मारुती स्विफ्ट हाही एक चांगला पर्याय आहे. तुम्ही चार-पाच महिने थांबू शकत असाल तर होंडाची नवीन जॅझ बाजारात येत आहे, तिचीच निवड करा.