मला सायकल लहानपणापासून येत होती. पण नोकरीस लागल्यावर मोटरसायकलची गरज निर्माण झाली. त्यावेळी कल्याणमध्ये फक्त बजाज मोटरसायकल मिळत होती. पण ती मला परवडत नव्हती. तेव्हा मी ठाण्यात शोधल्यावर रेमोना नावाची तीन गीअरची मोटरसायकल स्वस्तात विकत मिळाली. ते वर्ष १९८२ होते. पण मला मोटरसायकल चालवता येत नव्हती. तेव्हा त्या दुकानाच्या मेकॅनिकने मला ठाणे पूर्वेस दोनतीन दिवस चालवयास शिकवली.
नंतर त्याच्याच मदतीने कल्याणला आणली. नंतर सीटच्या पुढे व हँडलच्या आधाराने सळ्या लावून व उशी ठेवून मुलांना बसण्याची सोय केली. नंतर बायको व मुलांबरोबर कल्याणमध्ये खूप भटकलो. तेव्हा मी घर बांधत होतो. बांधकामाचे मटेरियल खरेदी करण्यासाठी मला खूप फिरावे लागे. त्यासाठी मला गाडी खूप उपयोगी पडली.
– प्रफुल्ल मेंडकी, कल्याण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतरंगी बाइक, सतरंगी कार..
अनेकदा आपल्याला फिरताना, वाचताना, सìफग करताना विविध प्रकारच्या बाइक आणि कार पाहायला किंवा त्यांच्याविषयी वाचायला मिळते. आपल्यापकी अनेकजण त्या बाइक/कारची माहिती वा छायाचित्रे परस्परांशी शेअर करता. आता तुम्ही ते आमच्याशी शेअर करायचं. तुम्हाला अशा कोणत्याही बाइक अथवा कार दिसल्या तर आम्हाला त्याचे छायाचित्र आणि थोडक्यात माहिती मेल करायची. तुमच्या नावासकट गाडीची माहिती व छायाचित्र अतरंगी बाइक, सतरंगी कार या शीर्षकाखाली ड्राइव्ह इट पानावर प्रसिद्ध केले जाईल. मात्र, संबंधित बाइक आणि कार जरा हटकेच हवी. तरच तिला योग्य प्रसिद्धी दिली जाईल. आणि अर्थातच माहितीच्या सोर्सचाही उल्लेख हवाच..

घडी घालून ठेवता येऊ शकेल अशी ही मोव्हिओ बाइक. युरोपात तिची निर्मिती करण्यात आली असून ती इलेक्ट्रिकवर चालते. मेन्टेनन्स फ्री असलेली ही बाइक पार्क करायची गरजच नाही. काम झाले की तिची घडी घालायची आणि स्वतबरोबर कॅरी करायची. भारतात मात्र अद्याप ही बाइक उपलब्ध झालेली नाही.

मेड फॉर इच अदर
  लहानपणी मी सायकल चालवायला शिकलो नाही आणि बाइक घेण्याच्या आधीही नाही. माझ्या मित्रांकडे मी ‘मला बाइक चालवायला शिकवा ना रे’ अशी सतत विनवणी करीत असे, पण माझे मित्र मला ‘आधी सायकल चालवायला शीक’ म्हणून माझी बोळवण करीत असत. शेवटी स्वत:च बाइक चालवायला शिकायची आणि मित्रांची तोंडे गप्प करायची, असा निर्धार केला. त्यासाठी मी ‘सुझुकी-मॅक्स १०० आर’ ही सेकंड हॅण्ड बाइक खरेदी केली आणि सायकल चालवण्याचा कोणताच अनुभव नसताना मी पहिल्याच राइडमध्ये बाइक चालवण्यात यशस्वी ठरलो. अर्थात एक्स्पर्ट व्हायला थोडा वेळ लागला. माझ्या पहिल्या ‘सुझुकी मॅक्स १०० आर’ची फायिरग एवढी जबरदस्त होती की, मी ती पळवत आणली की माझे मित्र ‘अरे हेलिकॉप्टर आले’ म्हणून माझी आणि माझ्या बाइकची टर उडवत असत. पण पिकअप आणि स्पीडच्या बाबतीत मला सुझुकीनं खूपच आनंद दिला आहे. शिवाय माझे मित्रही माझीच बाइक चालवून बाइक चालवायला शिकले आहेत. आता सुझुकी माझ्याकडे नाहीये. माझ्या मुंबई-नाशिक हायवेवर झालेल्या अ‍ॅक्सिडेंटमध्ये ती खूप डॅमेज झाली आणि नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो. नाइलाजाने मला ती विकावी लागली. पण मी तिला खूप मिस केले. त्या वेळेस जसे आपण एखाद्या जिवलग माणसाला निरोप देतो आता माझ्याकडे हिरो होंडा पॅशन प्रो आहे. माझे बाइकप्रेम, माझी मौजमजा आणि माझ्या जिंदगीची सफर ती अगदी आनंदाने पुरवत आहे. या बाइकवर भंडारदरा, भातसा डॅम, नाशिक शहर आणि आसपासचा परिसर आणि निसर्गरम्य इगतपुरी या परिसरात सतत भटकणे होते. आणि हो, मी माझ्या बाइकची खूप काळजी घेत असतो. कारण तीही माझी सर्व हौसमौज पुरवते ना! असे वाटते, आम्ही मेड फॉर इच अदर आहोत.
 अतुल कांबळे, कसारा

मी बाइकवेडा
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crazy guy on a bike
First published on: 11-12-2014 at 04:34 IST