तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द. 
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

माझी बाइक माझ्या प्रेमाची साक्षीदार

माझ्याकडे बजाज डिस्कवर बाइक आहे. बाइकवरून प्रवास करायला मला खूप आवडतं. मी औरंगाबादला असतो. मी माझ्या बाइकवरून कोल्हापूरला गेलेला अनुभव माझ्यासाठी खूप संस्मरणीय आणि थरारक आहे. मार्च २०१३ ला मी माझ्या मित्रासोबत माझ्या मत्रिणीला कोल्हापूरला भेटायला जायचा प्लान केला आणि चक्क बाइकवरून तेही घरी न सांगता. सुरुवातीला मित्रांनी माझे बोलणे ऐकूनच नाही घेतलं. त्यांना मी चेष्टा करतोय असंच वाटलं. पण मी ठरवलं होत की मी तिला भेटायला चक्क बाइकवरूनच जाणार. २४ तारखेला सकाळी ५ वाजता मी आणि माझा मित्र औरंगाबादवरून निघालो. नगर, सांगोलामाग्रे जाऊन अकलूजला मित्राकडे दुपारी ३:३० ला पोचलो. तिथे रात्रभर राहून सकाळी ४ ला परत निघलो. ९:१५ला कोल्हापूरला पोचलो. विशेष म्हणजे माझी आणि माझ्या मैत्रिणीची ती पहिलीच भेट होती. आम्ही फोनवरून एकमेकांना ओळखत होतो. चुकून माझ्याकडून गेलेल्या मेसेजमुळे आमची ओळख झाली होती. पण हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आता आमच्या रिलेशनशिपला १ वर्षसुद्धा होऊन गेले. म्हणूनच माझी बाइक माझ्या प्रेमाची साक्षीदार आहे. माझे प्रेम मला मिळवून देण्यात तिचा खूप मोठा वाटा आहे. जितके प्रेम मी माझ्या प्रियेवर करतो, तितकेच माझ्या बाइकवर पण करतो. आय लव्ह माय बाइक!

गंगाधर दळवी,
औरंगाबाद.

आयुष्याच्या वाटेवर चालताना एका सोबतीची गरज असते आणि तेही शेवटपर्यंत साथ देण्यासाठी. मला पण अशीच गहरी साथ दिलीये माझ्या रॉयल एन्फिल्ड बुलेटने. आईवडिलांचा आशीर्वाद आणि माझ्यासोबत प्रत्येक प्रवासात मला सतत साथ देणारी माझी बुलेट आयुष्यात आली आणि माझे आयुष्यच बदललं. चांगला जॉब, चांगली प्रगती. मला माझी बुलेट आणि आईबाबांचा आशीर्वाद.
रितेश