मी बाइकवेडा..

माझ्या आयुष्यात मोटारसायकल आली आणि माझ्या जीवनाचा मार्ग सुकर करण्याची संधी मला प्राप्त झाली. १९८५मध्ये त्यावेळी नुकत्याच लाँच झालेल्या हिरो होंडाच्या एक हजार गाडय़ांमधील सीडी १०० ही गाडी मी १२ हजार ३६० रुपयांना विकत घेतली. मला लाल रंगाचीच गाडी हवी होती, आणि ती मिळालीही.

तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! 
शब्दमर्यादा : २०० शब्द.

ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

मायेची सावली
43माझ्या आयुष्यात मोटारसायकल आली आणि माझ्या जीवनाचा मार्ग सुकर करण्याची संधी मला प्राप्त झाली. १९८५मध्ये त्यावेळी नुकत्याच लाँच झालेल्या हिरो होंडाच्या एक हजार गाडय़ांमधील सीडी १०० ही गाडी मी १२ हजार ३६० रुपयांना विकत घेतली. मला लाल रंगाचीच गाडी हवी होती, आणि ती मिळालीही. मी प्लम्बर लेबर काँट्रॅिक्टगची कामे करतो. त्यामुळे व्यवसायाला या गाडीचा फायदाच झाला. माझा व्यवसाय दुणावला. खऱ्या अर्थाने गतीही मिळाली. १९९५मध्ये माझी गाडी खार येथून चोरीला गेली. मला काही सुचेचना. पोलिसांत तक्रार नोंदवली, तरीही मी एकटाच गाडीच्या शोधात फिरत राहिलो. माझ्या आईप्रमाणेच होती ही गाडी माझ्यासाठी. त्यामुळे आई हरवल्यावर तिला शोधण्यासाठी लहान मूल जसे कावरेबावरे होऊन इकडेतिकडे तिचा शोध घेईल अगदी तस्साच मी माझ्या गाडीचा शोध घेत होतो. माझ्या गाडीने अगदी आईप्रमाणेच माझी काळजी घेतली होती. कितीही लांबच्या प्रवासाला गेलो तरी कुठेही मला तिने इजा होऊ दिली नाही, की कुठे बंद पडून मला त्रास दिला नाही. गुणाची ही माझी गाडी सापडावी म्हणून मी देवाकडे प्रार्थना करू लागलो. अखेरीस माझ्या प्रार्थनेचे फळ मिळाले. आठ दिवसांनी मला पोलीस ठाण्यातून फोन आला. त्यांना गाडी सापडली होती. मला प्रचंड आनंद झाला. आता तर मी तिची विशेष काळजी घ्यायला लागलो. गेल्या तीन दशकांपासून ही गाडी मी जपून ठेवली आहे. माझ्या कुटुंबाचा अविभाज्य घटकच झाली आहे ती. माझा मुलगा आता ही गाडी चालवतो. मी त्याला सांगितलंय, ही गाडी माझ्या आईची सावली आहे. तुलाही ती अशीच सावली देईल यावर श्रद्धा ठेव.
शांताराम पाटकर,
अंधेरी (मुंबई)

सर्व बाइकवेडय़ांना समर्पित
बाइकवेडा म्हटलं की आपल्यासमोर स्पोर्ट बाइक आणि तिचा स्टायलिश मालक असंच चित्र उभं राहतं. मात्र, याला अपवाद आहेत आणि मी त्यातलाच एक! भले माझ्याकडे स्वत:ची बाइक नसू देत, पण वेडापुढे कोणाचं काही चाललंय का!

44आíथक उदारीकरणाची फळं खेडेगावात पोहोचू लागलेल्या काळात आमच्या पिढीचा उदय झाला. काही लोकांकडे मोटारसायकल येऊ लागल्या. त्यांच्या बद्दलचं आकर्षण वाढू लागलं. मग कुणाच्या गाडीवर दुधाचे कॅन्स घेऊन बस, तर कुणाच्या चाऱ्याची ओझी घरापर्यंत किंवा संकलन केंद्रापर्यंत नेऊन दे असं करू लागलो. कारण यामागे एकच उद्देश असायचा, की परत येताना मलापण गाडी चालवायला मिळेल. हे जणू आम्हा गावाकडच्या मुलांचं ड्रायिव्हग स्कूलच झालं होतं. इथे आम्ही ड्रायव्हर बनलो. कच्च्याचे पक्के झालो. मग कुणाला स्टेशनला सोडव, कुणाला दवाखान्यात, तर कोणाला परगावी घेऊन जा, अशा छोटय़ा-मोठय़ा जबाबदाऱ्या घेण्यासाठी आम्ही तयारच असायचो. बऱ्याचदा, मलाच सांगा असा जॅकही लावायचो. या गोष्टीचा फायदा असा झाला, की इथे आपल्याला लूना, बजाज एमएटी, सुझुकी, यामाहा, हिरो होंडा, बुलेट अशा अनेक बाइक्स चालवायला मिळाल्या. प्रत्येकीची चालू करण्याची पद्धत, बंद पडली तर नखरे आणि तिला मनवण्याच्या पद्धती समजल्या. तरी पण जुन्या झालेल्याच जास्त गाडय़ा असल्याने आणि बऱ्याचदा पेट्रोलचा अंदाज न आल्याने फारच थोडय़ा जणांनी माझ्या इतकी बाइक ‘ढकलली’ असेल- अशी एवढी पंचाईतही अनेक वेळा झाली आहे! पण बाइकप्रेमापुढे त्याची कुणाला पर्वा!
कॉलेजला पुण्यात गेल्यावर तर अनेकांकडे बाजारात नवीन आलेल्या आणि वेल मेन्टेन्ड अशा बाइक्स होत्या. सुदैवाने गोिवद, संज्योग, प्रीतेश, पंकज, अनूप, राहुल, वैभव यांच्यासारखे मित्र भेटले आणि त्यांच्याबरोबर पुणे व आसपासचा परिसर भटकता, भटकता आमचे बाइकवेड चालू राहिले. कंटाळा आला की एफसी रोडला एक राइड मारायचा किंवा झेड ब्रिजवरून मुठा नदी आणि तिचा आसमंत यांचे दर्शन घेऊन फ्रेश होऊन येणे हे नित्याचेच झाले होते. थोडं दूरवर बाइक-राइिडग करून एखाद्या निवांत टपरीवर गरमागरम चहा घेणंही चालू होतंच. या सर्व बाइकवेडामधे खंत एकाच गोष्टीची.. दुसऱ्याने मोठय़ा विश्वासाने दिलेले वाहन असल्याने, चुकून नुकसान होऊ नये यास्तव स्टंट्स मारू शकलो नाही. आतापर्यंतचं हे असं बाइकवेड आता स्वत:च्या बाइकच्या रूपातनं, होंडा युनिकॉर्न, जपतोय. सर्व बाइकवेडय़ांना समíपत..
अजिंक्य बनकर,
मु. पो. नाथाची वाडी,
ता. दौंड, जि. पुणे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I am crazy for bikes