‘जुळून येती रेशीमगाठी’ या सध्या गाजत असलेल्या मालिकेतील आदित्य ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा ललित प्रभाकरला प्रथमच मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली आहे. या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून यापूर्वी त्याने ‘तक्षकयाग’ या नाटकात तसेच ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जिवलगा’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. प्रायोगिक रंगभूमीवरही ललित प्रभाकर सातत्याने कार्यरत आहे.आदित्य या व्यक्तिरेखेमुळे खूप लोकप्रियता मिळत असून प्रेक्षकांकडून कौतुकाची थापही पाठीवर पडते. चित्रीकरणासाठी भरपूर वेळ लागत असल्याने मी सध्या कार घेऊन येतो. कारचे पॅशन किंवा ड्रीम कार असे काही मला सांगता येणार नाही. परंतु, अगदी ३-४ दिवसांपूर्वीच मी रिट्झ ही सेकण्ड हॅण्ड गाडी घेतली आहे. खरे सांगायचे तर कारपेक्षा मला बाईकचे खूप पॅशन आहे. मी लहान असल्यापासून बाबांकडे यामाहा कंपनीची फेझर ही बाइक होती. त्यामुळे त्यावरच मी बाइक चालवायला शिकलो. बाइक पॅशन म्हटले की एनफिल्डचे नाव घ्यावेच लागते. आपल्याकडे रॉयल एनफिल्डची शान, रूबाब काही औरच असतो. मला खरे तर रॉयल एनफिल्डची क्लासिक बॅटल ग्रीन मॉडेलची बाइक घ्यायला खूप आवडले असते. परंतु, ही बाइक फक्त लष्करासाठी आहे. त्यामुळे आता शक्य असेल तेव्हा  रॉयल एनफिल्डची डेझर्ट स्टॉर्म मॉडेलची बाइक घेण्याची मला खूप इच्छा आहे.  तीच माझी ड्रीम बाइक आहे. एक ते सव्वा लाख रूपये किमतीची ही बाइक मी एक दिवस नक्की घेईन.
शब्दांकन : सुनील नांदगावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My dream bike desert storm by royal enfield
First published on: 24-07-2014 at 01:04 IST