पुण्टो इव्हो
फियाटची पुण्टो ही हॅचबॅक प्रकारातली कार भारतीय रस्त्यांवर येऊन आता चांगली चार-पाच वष्रे झाली. लिनिया या सेडानबरोबर आलेल्या पुण्टोला मिळणारा प्रतिसाद तसा यथातथाच होता. मात्र, आता याच पुण्टोने कात टाकली आहे. ऑगस्टमध्ये पुण्टोची नवी आवृत्ती इव्हो बाजारात आली. आधीच्या पुण्टोमध्ये थोडा बदल करून नव्या अवतारात आलेली ही इव्हो फियाटच्या बाजारहिश्श्यात थोडी तरी क्रांती घडवून आणेल, अशी आशा करायला काहीच हरकत नाही.
नवीन आकाराचे १६ इंचाचे अ‍ॅलॉय व्हील्स, मागच्या बाजूची आसनव्यवस्था प्रशस्त आणि मागच्या सीटवर बसलेल्यांसाठी वातानुकूलनाची सोय. पुढेही ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्यांसाठी प्रशस्त बूट स्पेस आणि दुहेरी रंगाचा डॅशबोर्ड अशा सौंदर्याने नटलेली पुण्टो इव्हो रस्त्यावर धावायलाही तेवढीच डौलदार आहे. थोडक्यात, इव्हो ही फियाटसाठी क्रांतिकारी ठरेल, अशी आशा आहे. अ़नेक नव्या सोयीसुविधांनी ही गाडी नटली आहे. आतील जागा प्रशस्त करण्याबरोबरच चारही खिडक्यांना इलेक्ट्रॉनिक बटने, ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी ड्युएल स्टेज एअरबॅग व स्मार्ट व्हायपर, रिअर व्हायपर या नव्या गोष्टी पुण्टो इव्होमध्ये देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवे काय?
गाडीच्या बॉनेटवर असलेल्या दोन रेषा, ज्या फियाटच्या बोधचिन्हाजवळ जुळतात, व मागच्या बाजूला वळलेले हेडलॅम्प्स या दोन गोष्टींमुळे पुण्टो इव्होचा लूक आकर्षक वाटतो. शिवाय हेडलॅम्प व फॉगलॅम्प्समध्ये क्रोमचा वापर करण्यात आल्याने अंधार किंवा धुक्यातही समोरचे अगदी स्पष्ट दिसण्यास मदत होते. एलईडी ऑप्टिकल गाइड टेललॅम्प तसेच बाहेरच्या रिअरव्’ाू आरशांवर देण्यात आलेले िब्लकर्स या एकूणच रूपामुळे इव्हो आकर्षक बनली आहे. १६ इंचाच्या अ‍ॅलॉयमुळे तिच्या वेगातही भर पडली आहे.

इंजिन क्षमता
१.२ लिटर पेट्रोल व १.३ लिटर डिझेल क्षमतेचे इंजिन असून पेट्रोलमध्ये अ‍ॅक्टिव्ह, डायनॅमिक व इमोशन तर डिझेल प्रकारात अ‍ॅक्टिव्ह, डायनॅमिक, इमोशन व स्पोर्ट्स हे प्रकार उपलब्ध आहेत. २१ किमी प्रतिलिटर एवढा अ‍ॅव्हरेज मिळू शकतो. फाय स्पीड मॅन्युअल गीअरबॉक्स देण्यात आले असून स्पीड कंट्रोल करता येऊ शकतो.

अंतर्गत रचना
गाडीच्या अंतर्गत भागात वर म्हटल्याप्रमाणे अनेक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. उच्च दर्जाचा व आलिशान सॉफ्ट टच डॅशबोर्ड हे प्रमुख आकर्षण. त्याचबरोबर अ‍ॅम्बियन्ट लाइट, पियानो फिनिश केंद्रीय कन्सोल, स्पोर्टी डायल्स व नवीन रंगसंगतीमुळे इव्हो आलिशान वाटते. तसेच गाडीतून प्रवास करू इच्छिणा-यांच्या गरजा लक्षात घेऊन तिची रचना करण्यात आली आहे. पाण्याची बाटली ठेवण्यासाठी दरवाजांमध्ये एक कप्पा तयार करण्यात आला आहे. तसेच मागे बसणाऱ्यांसाठी वातानुकूलन व्यवस्था होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या वातानुकूलन यंत्रणेसमोरच चहाचा कप तसेच पाण्याची बाटली ठेवता येऊ शकेल असा कप्पा देण्यात आला आहे. मात्र, सनरूफ देण्यात आलेला नाही. अ‍ॅटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सीडी, एमपी थ्री, यूएसबी, ब्ल्यूटूथ व व्हॉइस रेकग्निशन आदींची सोयही यात आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी
इव्होमधील प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा यासाठी काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी युरोपीय मानकांचा वापर करण्यात आला आहे. नेहमीच्या सुरक्षा साधनांव्यतिरिक्त हॅचबॅक प्रकारात न आढळणाऱ्या सुरक्षा उपायांचा इव्होमध्ये करण्यात आला आहे. त्यात चालकासाठी टू स्टेज एअरबॅग, डबल क्रँक प्रिव्हेन्शन यंत्रणा, मागील आसनाची मेटल रिएन्फोस्र्ड पाठ, पुढील व मागील बाजूला स्मार्ट व्हायपर्स आदींचा त्यात समावेश आहे. याखेरीस हॅचबॅक गटात सहसा न आढळणारी तीन वर्षांची हमी की जी आणखी दोन वष्रे वाढवता येते. या पर्यायांसह देण्यात आली आहे. तसेच पुण्टो इव्होच्या सíव्हसिंगसाठी १५ हजार किमीचा टप्पा निश्चित करण्यात आला आहे.

किंमत
*  पेट्रोल
अ‍ॅक्टिव्ह       ४,७१,१४७.००
डायनॅमिक    ५,२८,३९०.००
इमोशन         ६,८६,४५९.००
*  डिझेल
अ‍ॅक्टिव्ह       ५,४४,४११.००
डायनॅमिक    ६,४०,८६५.००
इमोशन         ७,०४,६१४.००
स्पोर्ट             ७,४२,१११.००

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of fiat punto evo
First published on: 02-10-2014 at 04:07 IST