आज मी ५० च्या घरात असले तरी वयाच्या १९ व्या वर्षीच मी फियाट गाडी चालवायला शिकले. पण लग्नानंतर नवऱ्याच्या बदलीच्या नोकरीमुळे ड्रायिव्हगमध्ये सातत्य राहिले नाही. शिवाय बऱ्याचदा बाहेर जाताना आमच्या सँट्रोचे स्टीअिरग नवऱ्याच्या हातात असे. मात्र तो टूरवर गेला की खरेदी किंवा इतर कामांसाठी मी सँट्रो नेऊन ड्रायिव्हगची सवय ठेवलीय म्हणा किंवा ड्रायिव्हगची हौस भागवून घेते. नवऱ्याला जिप्सीचे प्रचंड कौतुक होते. म्हणून दोन वर्षांपूर्वी आम्ही जिप्सी घेतली. जिप्सीला पॉवर स्टीअिरग नसल्याने तिला सहजपणे वळवता येत नाही. म्हणून ती मी जेमतेम १-२ वेळाच थोडी चालवून पाहिली. पण माझ्या आयुष्यात एक दिवस माझी सत्त्वपरीक्षा घेणारा ठरला. गेल्या २८ मे रोजी नवऱ्याची मुंबईत र्अजट मीटिंग ठरली म्हणून आम्ही सकाळी गोव्याहून निघायचे ठरवले. आदल्या रात्री त्याला थोडी कणकण होती, पण क्रोसिन घेतल्याने बरे वाटले. सकाळी आमच्याबरोबर ९ वर्षांची नात म्हणजे पुतण्याची मुलगी निघाली. जेमतेम १५-२० किमी गेलो आणि दीपकला गाडी चालवणे कठीण जातेयसे मला जाणवले. पाहिले तर त्याच्या अंगात खूप ताप भरला होता आणि ग्लानी येत होती. घरी परतायचे का, विचारल्यावर नाही म्हणाला. कारण मीटिंग र्अजटच होती. त्याला पुन्हा क्रोसिन देऊन सीटवर रिलॅक्स पडायला सांगितले आणि मनाचा हिय्या करून आजवर न चालवलेल्या जिप्सीचे व्हील हाती घेतले. एक नजर बाजूला तापाने फणफणलेल्या नवऱ्यावर, मागे घाबरलेली नात आणि पुढचा मुंबईपर्यंतचा लांबलचक प्रवास त्या अवजड जिप्सीला हाकत मला करायचा होता. घाटात गाडी हाकताना प्रचंड टेन्शनखाली त्याला एकीकडे थोडय़ा थोडय़ा वेळाने िलबू सरबत प्यायला लावत ओल्या नॅपकीनने अंग पुसायला सांगत पुण्यापर्यंत गाडी आणली. तिथल्या डॉक्टरांकडे जावे की थोडे फ्रेश होऊन थेट मुंबईलाच निघावे, या द्विधा मन:स्थितीत सापडले. धीर अथवा सल्ला देणारे त्या क्षणी कुणीच नव्हते. अखेर सकाळसारखाच मनाचा हिय्या केला  आणि मुंबईचा एक्स्प्रेस वे पकडला, जो सुदैवाने मोकळा होता. संध्याकाळी ६च्या ठोक्याला मुंबईत आमच्या दारात पोहोचलो. नवऱ्याला ताबडतोब उपचार सुरू झाले. एकीकडे साऱ्यांनी माझ्या प्रसंगावधानाचे आणि धाडसाचे कौतुक केले आणि मी त्या अवजड जिप्सीचे संकटकाळी साथ दिल्याबद्दल मनोमन आभार मानले.
– माधुरी कोन्नूर, उसगाव- गोवा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले ड्रायिव्हग लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा.. मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा.
माहिती मेल करा.. ls.driveit@gmail.com

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thanks to gypsy
First published on: 27-03-2015 at 12:22 IST