18 March 2018

News Flash

‘जयप्रभा’ची लढाई..

निकालामुळे भालजी पेंढारकरांचा हा स्टुडिओ ‘वारसा इमारत व प्रांगण’ म्हणून संरक्षितच राहणार.

मुंबई | Updated: December 15, 2015 3:11 PM

न्यायालयात जो काही खटला होता, तो लतादीदी (आणि त्यांचा जयप्रभा स्टुडिओ) विरुद्ध राज्य सरकार असा होता. या न्यायालयीन वादात लौकिकार्थाने राज्य सरकारची बाजू खरी ठरली असली, तरी यातून झळाळून उठले ते ‘जयप्रभा’बद्दलच्या लोकभावनेचे सच्चेपण!

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी केलेल्या याचिकेत काहीही अर्थ नाही, असे बजावून मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली आणि कोल्हापूरचा ‘जयप्रभा स्टुडिओ’ जिंकला! हा स्टुडिओ खरे तर लतादीदींच्याच मालकीचा. न्यायालयात जो काही खटला होता, तो लतादीदी (आणि त्यांचा जयप्रभा स्टुडिओ) विरुद्ध राज्य सरकार असा होता. या न्यायालयीन वादात लौकिकार्थाने राज्य सरकारची बाजू खरी ठरली असली, तरी यातून झळाळून उठले ते ‘जयप्रभा’बद्दलच्या लोकभावनेचे सच्चेपण! या निकालामुळे भालजी पेंढारकरांचा हा स्टुडिओ ‘वारसा इमारत व प्रांगण’ म्हणून संरक्षितच राहणार आहे. तो विकण्याची, पाडला जाण्याची आणि तेथे भलतीच कुठली इमारत उभी राहण्याची शक्यता आता जवळपास संपली आहे.
जवळपास संपली म्हणण्याचे कारण असे की, सर्वोच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावून ‘ स्टुडिओ माझा- मी त्याचे काहीही करेन ’ असे म्हणण्याचा अधिकार लतादीदींना आहेच. त्यांच्यासाठी दिल्लीत निष्णात आणि नामवंत वकिलांची फौजही उभी राहू शकते. मात्र तसे झाल्यास हे वकील कोणता मुद्दा मांडणार, हा प्रश्न आहे. भालजी पेंढरकर यांच्याबद्दलच्या आदराचे वलय या स्टुडिओला प्रथमपासूनच आहे. १९३४ सालापासूनचा इतिहास असलेला हा स्टुडिओ गांधी-हत्येनंतर जाळला गेला, म्हणून पुन्हा नव्याने त्याची उभारणी झाली. या पुनर्बाधणीच्या मुद्दय़ावर आधी लतादीदींच्या बाजूने युक्तिवाद झाले होते. स्टुडिओ जुना नाहीच, मग त्याला वारसा कसा ठरवता, या मुद्दय़ावर एकदा भांडून झाले. मग उच्च न्यायालयात, हा स्टुडिओ ‘वारसा’ म्हणून जाहीर करताना विहित सरकारी प्रक्रिया पाळली गेली नाही, असाही मुद्दा मांडून झाला. दोन्ही मुद्दे निष्प्रभ ठरले आहेतच. मग यापुढे कोणत्या मुद्दय़ावर भांडणार?
एकंदर ११ एकरांवर पसरलेल्या या स्टुडिओची सात एकर जागा आधीच विकली गेल्यामुळे सध्या प्रश्न आहे तो चारच एकर जागेचा आणि त्यावरील बांधकामाचा. पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर, शोभना समर्थ आणि तनुजा अशा दोन गत पिढय़ांना या स्टुडिओबद्दल ममत्व होते. दादा कोंडकेंसारख्यांनी तर अख्खा स्टुडिओ परत पूर्वीच्या गतवैभवाला नेऊन ठेवण्याच्या ईर्षेने तो विकत घेण्याचीही तयारी चालविली होती. हा गतेतिहास हे खरे; पण वारशाचे महत्त्व इतिहासानेच तर खुलत असते. विझून गेलेली स्पंदने पुन्हा जेथे जाणवतात, तोच वास्तुवारसा. कोल्हापूरकर कलाप्रेमी आणि मराठी चित्रपट महामंडळ हे हा स्टुडिओ वाचवण्यासाठी उभे राहिले होतेच, पण या स्टुडिओचे ‘आत्मवृत्त’ लिहिण्याचे काम भालजींचे दिवंगत सुपुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी केले होते. या साऱ्याच प्रयत्नांचा अर्थ, ‘ जयप्रभा’ च्या जागेवर भालजींच्या कार्याचे उचित स्मारक व्हावे, असाच होतो हे वेगळे सांगायला नको.
पण म्हणून स्मारक होईलच असे नाही. सध्या ही जागा कुणा भलत्यासलत्याच्या घशात जाणार नाही, एवढेच नक्की झाले आहे. काळाचे घाव सोसत ‘जयप्रभा’ उभाच आहे, पण तेथे स्मारक होऊ द्यायचे की नाही, हे ठरवण्याचा हक्क मालकांकडे सुखरूप आहे. स्मारकासाठीची लढाई एकटे कोल्हापूरकरच लढणार की त्यांना महाराष्ट्राची साथ मिळणार, हे अद्याप अनिश्चित आहे.

First Published on December 15, 2015 3:11 pm

Web Title: bombay hc rejects lata mangeshkars plea seeking heritage tag for her studio
 1. S
  sarang
  Dec 18, 2015 at 4:58 pm
  एकदा मंगेशकर हॉस्पिटलला भेट देऊन यां किती जणांची श्रद्धा घालून बाई मजेत राहतात ते कळेल समजून घेतले तर,तुम्ही बाल्बोधी आहात म्हणून कोणालाही गटाराची भाषा वापरू नका.बाई फुकट मिळालेल्या जमिनीवर कसे मस्त हॉस्पिटलचा धंदा करतायेत ते समजून घ्या एकदा , जमीन सरकारची बिल्डिंग दान मिळालेल्या पैश्यावर NRI कडून UK & USA.मधल्या . हिंग लागे ना फितकरी,रंग भी चोख्खा !! कोणाला मुलगा कोणाला गुरु कोणाला भाई घरचे नाही कोणी पण सगळे कामाचे माणूस जरूर नातलग बनवले आहेत. काश जसा आवाज सुंदर आहे तसे मन सुंदर होते
  Reply
  1. P
   PDD Dange
   Dec 16, 2015 at 10:37 am
   करिअर मध्ये राजकारण असतेच. सर्वच करतात. सध्या आपल्या ऑफिस मध्ये नसते का राजकारण. म्हणून भारत रत्न द्यायच्या लायकीची नाही म्हणणे चूक आहे. भारत रत्न त्यांच्या कलेसाठी मिळालेले आहे.
   Reply
   1. P
    PDD Dange
    Dec 15, 2015 at 11:01 am
    लता मंगेशकर यांनी जर तो खरेदी केला असेल, त्यासाठी पैसे मोजले असतील, तर हा निर्णय चुकीचा आहे असे वाटते. आपण स्मारक स्मारक म्हणतो, पण तेवढ्या कळकळीने हे सर्व सांभाळतो का? आज आपल्या महारास्त्रात अशा किती तरी ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. हे सर्व सुधारणे जरुरी आहे. फक्त जागा बळकावून काही होणे नाही.
    Reply
    1. R
     RJ
     Dec 15, 2015 at 5:52 pm
     सिनेसृष्टी मुंबई-महाराष्ट्रात असल्याने ह्या शहरात-राज्यात व्यक्तिगत मालकीचे अनेक स्टुडीओ आहेत . त्यापैकी किती स्टुडीओना ‘वारसा इमारत व प्रांगण’ हा दर्जा आहे ?
     Reply
     1. R
      Rajendra
      Dec 18, 2015 at 1:27 pm
      सरकारने लता ताई ना त्यांनी भरलेली रक्कम परत करून studio ताब्यात घ्यावा व त्याचे स्मारकात रुपांतर करावे.
      Reply
      1. V
       vijay
       Dec 16, 2015 at 6:10 am
       बालपण अत्यंत गरिबीत गेले की एखाद्या व्यक्तीवर त्याचा असा परिणाम होतो की त्या व्यक्तीला संपन्नावस्था आल्यावर अमर्याद पैशाच्या मर्यादा समजू लागतात, प्रसंगी तिटकारा वाटू लागतो. या उलट काही संपन्न व्यक्ती मरेपर्यंत प्राथमिकता फक्त पैशालाच देतात, त्यांना कुबेरसुद्धा( गिरीश नव्हे!) समजूत घालू शकत नाही.या प्रकरणात जे काही चालू आहे त्यावरून सुज्ञ व्यक्ती योग्य निष्कर्ष काढत आहेतच.
       Reply
       1. S
        saurabh
        Dec 15, 2015 at 6:52 pm
        लताबाईंना ती जागा विकण्याचा अधिकार असायला हवा. लताबाईंकडून राज्यासरकारने जागा विकत घ्यावी हवी तर. कदाचित न्यायालयासमोर अजून काही मुद्दे असतील..
        Reply
        1. S
         Suresh
         Dec 20, 2015 at 11:00 am
         बोले तैसा चाले त्याची वंदावी पावुले असे सध्या तरी म्हणता येत नाही. लता दीदी या महान आहेत यात शंका नाही पण त्यांनी भावना आणि पैसा यात तफावत निर्माण केली आहे हे कोणी नाकारू शकत नाही. याचे एक उदाहरण इंदूर येथील मी मंगेशकर सभागृह आहे. दीदी च्या आईंच्या नावावर हे सभागृह बांधावे अशी जन इच्छा होती. त्यासाठी मंगेशकर परिवार धन जूटवणार असे निशित होते पण झाले उलटेच सध्या हा हि खटला सुरु असून संस्थे वर जब्ती आलेली आहे. वाद नको खरे तर संवाद हवा नाहीतर हि जागा पण संस्थे कडून जाणार. जे होईल ते पाहावे हे खरे
         Reply
         1. M
          Mayur Thorawade
          Dec 16, 2015 at 12:18 pm
          Changala nirnay aahe kharach...Amhi kolhapurkar Jayprabha studio javalun jayacho tevha vatayach ki he vaibhav disanar nahi aata....chan zal..... Mahan lokanchi mahanata kharach kashatun baghvi......
          Reply
          1. A
           Aniruddha
           Dec 18, 2015 at 5:37 am
           लता वर काही टीका करण्या आधी पूर्ण व खात्रीलायक माहिती असणे गरजेचे आहे. लता वर टीका करण्याची कुणाचीही लायकी नाही. पडत्या काळात तिने जयप्रभा वाचवला होता. भालजी पेंढारकर यांचे साधा माणूस पुस्तक वाचा. आणि एक, ओ.पी व नौशाद अखेरपर्यंत लता ला मनात राहिले. शिवाय तिने कुठल्याही गायिकेला बरबाद केल्याचा कुठलही पुरावा उपलब्ध नाही. तोंडाची गटारे आहेत म्हणून उघडी टाकू नका.बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला.
           Reply
           1. Shanker Travden
            Sep 11, 2016 at 7:05 am
            अशा लोकांना देशाने ' भारत रत्न ' हि सर्वोच मनाची पदवी दिली याची भारतीय म्हणून लाज वाटते!
            Reply
            1. Shanker Travden
             Sep 11, 2016 at 7:13 am
             लता दीदींनी आपल्या उमेदीच्या काळात अनेक तरुण, गुणवंत गायकांना संधी देणाऱ्या संगीत दिग्दर्शकांना दबाव आणून, बहिष्कार घालण्याची धमकी देऊन रडकुंडीस आणले होते हे सर्व जाणतात, पण कोणी बोलत नाही, का, तर, या बाईंची पोहोंच, पत्रकार, शासन, राजकारणी, नोकरशाही, इ. सर्वाना म्हणजे करण्याची कला त्यांना माहित आहे!
             Reply
             1. V
              vasant
              Dec 15, 2015 at 11:34 am
              हि लता पक्की कंजुषा आहे पुण्यात दिनानाथ काढले पण रोगी आणि कुतुंब्नीय दिन आणि अनाथ होतात सर्वात महाग व गरिबांना मदत तर दूरचा आहे . एक गण सोडले तर बआई माणूस म्हणून एकदम भंगार आहे .व माणूसघाणी आहे सर्व सामान्य लोकांना माणूस म्हणून वागवत नाही
              Reply
              1. युवराज
               Dec 16, 2015 at 9:48 am
               लताबाईंना दादा कोंडकेंनी स्टुडीओ विकत घेण्यासाठी पैसे देऊ केले होते, भालजींच्या आदराखातर पण या कपटी बाईंनी ते नाकारले, त्यावेळेस भालजी जिवंत होते, ज्यांनी यांच्या करियर साठी मदत केली, मुलीसारखं वागवलं त्याची अशी परतफेड. यांना काय पैशाला तोटा आहे का? हपापली आहे पैशाला.
               Reply
               1. Load More Comments