News Flash

‘त्या’ वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भोपाळमधील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वक्तव्याची चौकशी सुरु असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.

हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 4:02 pm

Web Title: madhya pradesh chief electoral officer complaint received against pragya singh thakur
Next Stories
1 रावेरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत निम्म्या खुर्च्या रिकाम्या
2 काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर शिवसेनेचीच निवड का केली?, प्रियांका चतुर्वेदींनी सांगितले कारण
3 हेमंत करकरे हे प्रामाणिक अधिकारी होते – दिग्विजय सिंह
Just Now!
X