24 January 2020

News Flash

राहुल यांच्या प्रतिज्ञापत्राला आव्हान

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अमेठीतील एका अपक्ष उमेदवाराने शनिवारी उपस्थित केला.

संग्रहित छायाचित्र

नागरिकत्वावर आक्षेप; निवडणूक अधिकाऱ्यांपुढे उद्या सुनावणी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अमेठीतील एका अपक्ष उमेदवाराने शनिवारी उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असून, त्यावर सोमवारी सुनावणी होईल.

राहुल यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात विसंगत माहिती असल्याचा तक्रारदाराचा दावा आहे. भाजपनेही याबाबत स्पष्टीकरणाची मागणी राहुल यांच्याकडे केली आहे.

‘‘राहुल गांधी यांच्या वकिलाने तक्रारीत उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागितल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना सुनावणी लांबणीवर टाकावी लागली हे धक्कादायक आहे. राहुल यांच्यावरील आरोप धक्कादायक असून ते भारतीय नागरिक आहेत की नाही, ते ब्रिटिश नागरिक आहेत का, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी केली.

First Published on April 21, 2019 1:41 am

Web Title: rahuls affidavit challenged
Next Stories
1 ‘मोदींच्या नव्हे, त्यांच्या कामावर मते मागत आहोत’
2 व्ही.एच.अच्युतानंदन यांचे जनमानसातील स्थान अढळ
3 पुणे मतदारसंघ भाजपला अनुकूल?
Just Now!
X