News Flash

मला मत द्या अन्यथा तुम्हाला मी शाप देईन, साक्षी महाराज बरळले

तुमच्या आयुष्यातला आनंद मी हिरावून घेईन असेही साक्षी महाराज म्हटले आहेत

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मला मत द्या अन्यथा मी तुम्हाला शाप देईन असं म्हणत साक्षी महाराजांनी स्वतःलाच मत देण्याचं आवाहन केलं आहे. मी एक संन्यासी माणूस आहे. तुम्ही मला निवडून दिलंत तर मी निवडून येईन. निवडणूक हरलो तर देवळात भजन किर्तन करेन. मात्र तूर्तास मी तुमच्याकडे मतं मागतो आहे, तुमच्या मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार फिरतो आहे.

मात्र तुम्ही मला नाकारलत तर मात्र मी तुम्हाला शाप देईन, तुमच्या आयुष्यात असलेला आनंद मी हिरावून घेईन असंही साक्षी महाराजांनी म्हटलं आहे. साक्षी महाराजांच्या वक्तव्यावर अद्याप भाजपाने कोणतंही स्पष्टीकरण दिलेले नाही. एका इंग्रजी वृत्तपत्र संकेतस्थळाने या संदर्भातले वृत्त दिले आहे. साक्षी महाराज हे भाजपाचे खासदार असून ते उन्नावमधून निवडून आले आहेत.

वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी साक्षी महाराज प्रसिद्ध आहेत. आत्तापर्यंत अनेकदा त्यांच्या वक्तव्याचा आधार घेत विरोधकांनीही मोदी सरकारवर टीकाक कली. उन्नाव मध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. आता येत्या लोकसभा निवडणुकांणध्ये साक्षी महाराज पुन्हा एकदा खासदार होऊ इच्छितात. त्याचमुळे त्यांनी दारोदार हिंडून मतं मागण्यास सुरूवात केली आहे. तसेच मला निवडून दिलं नाही तर मी तुम्हाला शाप देईन असाही इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 4:57 pm

Web Title: vote for me or i will curse you warns bjps sakshi maharaj
Next Stories
1 राष्ट्रपतींना पत्र लिहिणारे आम्ही नव्हेच : माजी लष्करप्रमुख
2 मला मतदान करा नाहीतर.. मनेका गांधींचा मुस्लिमांना इशारा
3 नांदेड : काँग्रेसला भाजपाचं तगडं आव्हान, ग्रामीण मतदारांची भुमिका ठरणार निर्णायक
Just Now!
X