उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून, आता सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत आणि बहुमताचा आकडा २०२ आहे, उत्तराखंडमध्ये ७० जागा आहेत आणि बहुमताचा आकडा ३६ आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये एकूण जागा ११७ आहेत आणि बहुमताचा आकडा ५९ आहे. तर, गोव्यात विधानसभेच्या एकूण जागा ४० आहेत आणि बहुमताचा आकडा २१ आहे. दुसरीकडे, मणिपूरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या ६० आहे आणि बहुमताचा आकडा ३१ आहे. १० मार्च रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र तत्पूर्वी एक्झिट पोलनुसार निकाल जाहीर झाले आहेत. पाहूयात विविध एक्झिट पोलनुसार पंजाब आणि गोव्यात काय असणार आहे परिस्थिती –

इंडिया टुडे – एक्सिस माय इंडिया एक्झिट पोल – (पंजाब)

इंडिया टुडे – एक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला ७६ ते ९० जागांसह बहुमत मिळणार आहे. तर, काँग्रेस १९ ते ११, अकाली दल ७ ते ११, भाजप आघाडीला १ ते चार जागा मिळणार असल्याचे चित्र आहे.

Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Why Indian Muslims are banish from elections
भारतीय मुस्लीम निवडणुकीतून हद्दपार का?
triangular fight between bjp vanchit and congress in akola
अकोल्यात तिरंगी लढतीचा जुनाच डाव नव्याने; नवे समीकरण कुणाच्या पथ्यावर?
loksatta analysis survey in britain predict uk pm rishi sunak s seat at risk
विश्लेषण: ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पद धोक्यात? ताज्या निवडणूक सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?

टाइम्स नाऊ सर्वेचा – (पंजाब)

टाईम्स नाऊच्या सर्वेनुसार पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला धक्का बसणार असून आम आदमी पार्टी मोठा पक्ष असणार आहे. या ठिकाणी आम आदमी पार्टीला ७० जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसला २२ जागा मिळतील व एसएडी + १९ जागा, भाजपा आघाडी पाच जागा आणि इतरांना एक जागा मिळताना दिसत आहे .

इंडिया टीव्ही एक्झिट पोल – (गोवा)

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार १९ जागांसह भाजपा हा गोव्यातील सर्वात मोठा पक्ष असणार आहे. काँग्रेसला १४+ जागा मिळण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसला दोन आणि आम आदमी पार्टीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतर ५ जागा जिंकू शकतात. म्हणजेच गोव्यात कोणीही स्वबळावर सरकार बनवत नसल्याचे दिसत आहे.

झी न्यूज एक्झिट पोल – (गोवा)

झी न्यूज एक्झिट पोल नुसार गोव्यात भाजपाला १३-१८ जागा मिळू शकतात, काँग्रेसला १४-१९ जागा मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात एमजीपीला २-५ जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाला १-३ जागा मिळू शकतात तर इतरांना १-३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये काय होती परिस्थिती –

पंजाबमध्ये विधानसभेच्या सर्व ११७ जागांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान झाले. पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे आव्हान मिळाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर अकाली दल-बसपा युती तसेच भाजपा-पंजाब लोक काँग्रेस आणि अकाली दल (संयुक्त) यांच्या आघाडीत लढत झाल्याचे दिसून आले. पंजाबमध्ये दोन कोटी १४ लाख मतदार असून १३०४ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचे नाव जाहीर केलेले आहे. तर, आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांनी मुख्यमंत्रपदाचा उमेदवार घोषित करण्यात आलेलं आहे. तर, पंजाबमध्ये भाजपा आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला आहे.

गोव्यात काय होती परिस्थिती –

गोवा विधानसभेच्या सर्व ४० जागांसाठी १४ फेब्रवारी रोजी मतदान झाले होते. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, गोव्यात ४० विधानसभा जागांसाठी ७८.९४ टक्के मतदानाची नोंद झाली. गोवा हे देशातील सर्वात छोटं राज्य असून उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोनच जिल्हे आहेत. उत्तर गोव्यात सर्वाधित ७९ टक्के तर दक्षिण गोव्यात ७८ टक्के मतदानाची नोंद झाली असल्याची माहिती समोर आली होती. आता १० मार्च रोजी निकालाची घोषणा होणार आहे.

दरम्यान, गोव्यात काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत युती करत ही निवडणूक लढवली. या युतीचा फायदा होत बहुमत मिळेल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केलेला आहे. तर, यंदा सत्ताधारी भाजपा आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस हे पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षाशी युती होती. याशिवाय, महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील गोव्यातील निवडणुकीत उडी घेत निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली होती. आम आदमी पार्टीने मात्र गोव्यात स्वबळावर लढत दिली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उत्पल पर्रिकर यांच्या जागांची उत्सुकता –

भाजपाचे दिवंगत नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपाने तिकीट नाकारल्याने बऱ्याच उलट सुलट चर्चा सुरू होत्या, शिवसेनेने या मुद्य्यावरून भाजपावर जोरदार टीका केली होती, शिवाय उत्पल पर्रिकर लढत असलेल्या पणजी मतदार संघातून शिवसेनेने आपला उमेदवार देखील मागे घेतला होता. त्यामुळे या मतदार संघात काय निकाल लागणार याची देखील सर्वांना उत्सुकता आहेच.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव (तृणमूल काँग्रेस), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), विजय सरदेसाई (गोवा फॉर्वर्ड पक्ष), सुदीन ढवळीकर (मगोप), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल आदी निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक १७, तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या़ मात्र, भाजपने सत्तेचे गणित जमवून काँग्रेसला धोबीपछाड दिला होता़