देशभरात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा ज्वर आता वाढू लागला आहे. केंद्रातील प्रमुख नेत्यांप्रमाणेच राज्या-राज्यांमध्येही प्रचार शिगेला पोहोचला आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला असून आता पुढच्या टप्प्यासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानाआधीच भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत पहिला विजय मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. सूरतमधील भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल हे एकही मत न मिळवता विजयी ठरले आहेत. पण नेमकं असं काय घडलं?

गुजरातमध्ये तिसऱ्या टप्प्यात, अर्थात ७ मे रोजी लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी आज, म्हणजेत २२ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. गुजरातच्या सूरत लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून मुकेश दलाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस वगळता त्यांच्या समोरच्या इतर सर्व विरोधी उमेदवारांनी आज आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजपा असा हा सामना होईल, अशी अटकळ होती. पण निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे काँग्रेसही या मतदारसंघाच्या निवडणुकीतून बाहेर पडली आणि मुकेश दलाल यांचा एकही मत न मिळवता विजय झाला!

mahayuti, pune, Shivsena,
पुणे : शहरात महायुतीमध्ये तिढा, शिवसेनेकडून तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा
is Congress building a front on 288 seats on its own for the assembly elections
आघाडीत बिघाडी होणार…? काँग्रेसकडून सर्व २८८ जागांवर…
ramesh keer, Congress, niranjan davkhare,
काँग्रेसचे रमेश कीर मतदारांवर प्रभाव पाडण्यात अपयशी, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरेंची हॅटट्रीक
Wardha, victory, Lok Sabha,
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे प्राधान्यात बदल, आता ‘हा’ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर
anil bonde mp
खा. अनिल बोंडे म्हणतात, “विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मस्ती…”
yogendra yadav analysis bjp performance in lok sabha poll
 लेख : सत्ता होती तिथे हार…
Vanchit Bahujan Aghadi,
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा ‘फुगा’ का फुटला ?
Nashik, Central, West,
नाशिक मध्य, पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील समीकरणे बदलणार ?

काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द

मुकेश दलाल यांच्याविरोधात काँग्रेसकडून निलेश कुंभाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या अर्जामध्ये पुरस्कर्ते म्हणून देण्यात आलेल्या तीन नावांमध्ये गडबड असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी अर्जाची छाननी करून संबंधित व्यक्तींना सादर करण्याचे निर्देश कुंभाणी यांना दिले. मात्र, कुंभाणी यांना एकाही व्यक्तीला सादर करण्यात अपयश आल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करत असल्याचा निर्वाळा सौरभ पारधी यांनी दिला.

कुंभाणी यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसा यांचा अर्जही निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. त्यामुळे काँग्रेसदेखील या मतदारसंघाच्या निवडणुकीतून हद्दपार ठरली.

Video: “काँग्रेस मुस्लिमांना, जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल”, पंतप्रधान मोदींचं राजस्थानच्या सभेत विधान!

“कुंभाणी आणि पडसल यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. कारण प्रथमदर्शनी त्यांच्या अर्जांवर असलेल्या पुरस्कर्त्यांच्या सह्या खोट्या आढळून आल्या”, असं सौरभ पारधी यांनी त्यांच्या आदेशपत्रात नमूद केल्याचं इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

तिघांचं अपहरण? काँग्रेसचा दावा

दरम्यान, कुंभाणी यांच्या अर्जावर सह्या केलेल्या तिन्ही व्यक्तींचं अपहरण करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जांवर त्यांनी सह्या केल्या आहेत की नाही, याऐवजी त्यांच्या अपहरणाची चौकशी करायला हवी, अशी भूमिका काँग्रेसचे स्थानिक नेते बाबू मंगुकिया यांनी म्हटलं आहे.