देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच आता आरजेडीचे प्रमुख नेते लालू प्रसाद यादव हेदेखील सक्रीय झाले असून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान, कब्रिस्तान, हिंदू मुस्लीम, मंदिर मशीद हे मोदींचे आवडते शब्द असल्याचे ते म्हणाले. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

मागील काही दिवसांपासून प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनेकदा हिंदू मुस्लीम, पाकिस्तान, कब्रिस्तान मंगळसूत्र या शब्दांचा उल्लेख केला आहे. यावरूनच लालू प्रसाद यादव यांनी त्यांना टोला लगवला आहे.

readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : इतरांची घराणेशाही तेवढी अयोग्य!
Shiv Khori temple
यूपीएससी सूत्र : रेझिस्टन्स फ्रंट दहशतवादी संघटना अन् केंद्रीय मंत्र्याचे अधिकार-कर्तव्य, वाचा सविस्तर…
dr subhash chandra appeal all to stand against threats to press freedom
माध्यम स्वातंत्र्याच्या धोक्यांविरोधात एकजूट करण्याचे ‘झी’ समूहाचे सुभाष चंद्रा यांचे आवाहन 
Manmohan Singh
मुस्लिमांचा संपत्तीवर पहिला अधिकार? मोदींच्या आरोपावर मनमोहन सिंगांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Government extends tenure of Army Chief General Manoj pande
भारतीय लष्करप्रमुखांच्या अनपेक्षित मुदतवाढीचा मुद्दा चर्चेत का? लष्करप्रमुखांची नियुक्ती आणि निवृत्तीचे नियम काय आहेत?
Punjab Panj Pyare PM Modi Sikh religion Mohkam Singh
“गुरु गोविंद सिंगांच्या पाच प्रिय व्यक्तींपैकी एक माझे काका”; पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य का चर्चेत आले आहे?
Putin, Putin news, Russia,
विश्लेषण : रशियात एकामागून एक लष्करी सेनापतींना पुतिन बडतर्फ का करत आहेत? भ्रष्टाचाराबद्दल की आणखी काही कारण?
cm yogi adityanath marathi news
“सत्ता आल्यास ६ महिन्यांत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ”, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्धार

हेही वाचा – Sex Tape Scandal बाहेर आल्यानंतर घरकाम करणारी महिला बेपत्ता; आमदार एचडी रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल

नेमकं काय म्हणाले लालू प्रसाद यादव?

आज हिंदी भाषेत सुमारे १.५ लाख शब्द बोलले जातात आणि अभ्यासाच्या सर्व शाखांमध्ये तांत्रिक शब्दांसह सुमारे ६.५ लाख शब्द आहेत, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात आवडते शब्द कोणते असतील तर ते पाकिस्तान, स्मशानभूमी, कब्रिस्तान, हिंदू मुस्लीम, मंदिर मशीद, मासे-मुघल, गाई-म्हशी, हे आहेत, असा टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला आहे.

वरील शब्दांची यादी केवळ पहिल्या दोन टप्प्यांच्या निवडणुकांपर्यंतची आहे. शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यापर्यंत या यादीत काही नावं आणखी जोडली जाऊ शकतात. नोकरी-रोजगार, गरीबी-शेतकरी, महागाई-बेरोजगारी, विकास- गुंतवणूक, विद्यार्थी, विज्ञान, युवक इत्यादी मुद्दे मोदी विसरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.