गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले असून, भाजप-काँग्रेसमध्ये कमालीची चुरस आहे. भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मांद्रे मतदारसंघातून ते साडेतीन हजार मतांनी पराभूत झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Goa Assembly Election Results 2017 Live Updates

गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे. उत्तर प्रदेशात भाजपने जोरदार मुसंडी मारली असली तरी सुरुवातीचे कल बघता गोव्याचा गड भाजपच्या हातून निसटेल की काय, असे वाटू लागले आहे. त्यात सुरुवातीचे कल येताच भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे मांद्रे मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांना तब्बल साडेतीन हजार मतांनी पराभूत व्हावे लागले आहे. गोव्याच्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्र्यांचा पराभव झाल्याने भाजपसाठी ही ‘धोक्याची घंटा’ असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, पार्सेकर हे मांद्रे विधानसभा मतदारसंघातून तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले होते. गोव्यात भाजप मजबूत करण्यात पार्सेकरांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, यावेळी त्यांना बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागला. २००२ मध्ये त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे रमाकांत यांचा ७५० मतांनी पराभव केला होता. तर २००७ आणि २०१२ मध्येही ते विजयी झाले होते. गोव्यात २०१२ मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने सत्ता स्थापन केली होती. मनोहर पर्रिकर हे केंद्रात गेल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे
रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर लक्ष्मीकांत पार्सेकर यांची वर्णी लागली होती. मुख्यमंत्रीपद मिळण्याआधी त्यांच्याकडे आरोग्य मंत्रीपद होते. याशिवाय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचेही असल्याचे मानले जाते.

मराठीतील सर्व गोवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa assembly election 2017 result goa cm election laxmikant parsekar loss in mandrem
First published on: 11-03-2017 at 10:58 IST